दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित; लेक रिद्धिमा झाली भावूक

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या जयंती दिनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटांचं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. हे पोस्टर शेअर करत लेक रिद्धिमा भावूक झाली.

rishi-kapoor-last-film-sharmaji-namkeen-poster-out

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आज जयंती आहे. गेल्या वर्षी 30 एप्रिल रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. आज ते या जगात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते आजही जिवंत आहेत. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने वडिलांच्या आठवणीत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडील ऋषी कपूर यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘शर्माजी नमकीन’चं फर्स्ट लूक आऊट झालंय.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजच्या जयंती दिनी त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘शर्माजी नमकीन’चं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. यात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा या चित्रपटातील फर्स्ट लूक आउट करण्यात आलाय. अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं होतं, त्यावेळी त्यांनी या चित्रपटातील बऱ्याच भागाचं शूट केलं होतं. ऋषी कपूर यांच्या या चित्रपटासाठी फॅन्स देखील गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. परंतू करोना परिस्थितीमुळे या चित्रपटाच्या रिलीजला उशिर झाला होता. हा चित्रपट गेल्याच वर्षी याच तारखेला रिलीज करण्यात येणार होता.

‘शर्मा जी नमकीन’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सर्दीचा माहौल दाखवण्यात आलाय. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये ऋषी कपूर यांनी जर्सी परिधान करत गळ्यात मफलर गुंडाळून अगदी मस्तीमध्ये चलताना दिसून येत आहेत. त्यांच्या हातात एक सूटकेस दिसून येतेय. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये त्याच लोकेशन आणि लूकमध्ये अभिनेते परेश रावल सुद्धा दिसून येत आहेत. खरं तर अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर उरलेल्या भागाचं शूट अभिनेते परेश रावल यांनी पूर्ण केलंय. अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘शर्माजी नमकीन’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय. त्यानंतर ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमाने सुद्धा त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचं पोस्टर केलंय.

आणखी वाचा : Sidharth Shukla funeral: सिद्धार्थच्या अंतिम संस्कारावेळी संभावनाचा पोलिसांसोबत वाद?

अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजच्या जयंतीचं निमित्त साधत आठवणींच्या रूपात त्यांच्या अधुऱ्या चित्रपटाला पूर्ण करत यातील ऋषी कपूर यांचा फर्स्ट लूक शेअर करत लाखो चाहत्यांसाठी अनोखी भेट दिलीय. एक्सेल एंटरटेनमेंट आणि मॅकगफिन पिक्चर्सद्वारे निर्मित तसंच नवोदित हितेश भाटियाद्वारे दिग्दर्शित या चित्रपटात एका प्रेमळ 60 वर्षीय व्यक्तिची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हितेश भाटिया हे डायरेक्टोरियल डेब्यू करणार आहेत. तर जुही चावला देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी पोस्टर रिलीज करताना निवेदन जारी करून ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिलाय आणि ऋषी कपूर यांच्या अधुऱ्या चित्रपटाला पूर्ण केल्याबद्दल परेश रावल यांचे आभार मानले आहेत.

ऋषी कपूर यांच्या आठवणीत त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरने देखील एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. वडील ऋषी कपूरसोबत आपल्या लहानपणीसोबतचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत ही स्पेशल पोस्ट लिहिली आहे. यात तिने लिहिलं, “पापा, तुमचा वाढदिवस प्रत्येक वर्षी साजरा करतोय. तुमची खूप आठवण येतेय आणि आजही तुमच्यावर खूप प्रेम करतोय. स्वर्गातला सर्वात जास्त चमचमणाऱ्या ताऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….लव्ह यू.”

आणखी वाचा: ‘मरण आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान नसतं…; सिद्धार्थ शुक्लाचं हे भावूक ट्विट व्हायरल

आणखा वाचा : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा नीरज चोप्राला प्रश्न; म्हणाली….

रिद्धिमाची ही पोस्ट चाहत्यांसोबतच सेलेब्सनाही आवडली आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रे, सोफी चौधरी सारख्या अनेक सेलेब्सनी या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहेत. त्याचबरोबर रिद्धिमाचा भाऊ रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भट्ट हिची आई सोनी राजदान यांनीही या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharma ji namkeen first look out rishi kapoor last film completed by paresh rawal prp