ही अभिनेत्री म्हणते..’अरे तैमुर तर माझ्यापेक्षा प्रसिद्ध’

तैमूरची नव्हे तर त्याच्या आजीच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

taimur
तैमुर
‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातून पुन्हा एकदा कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमूर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. स्टारकिडच्या यादीत अग्रस्थानावर असलेल्या तैमूरच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ आहे. त्यातच तो आता लोकप्रियतेच्या यादीमध्ये बॉलिवूडच्या सेलेब्सनाही मागे टाकत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच्या याच लोकप्रियतेबाबत त्याच्या आजीने एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सध्या तैमूरची नव्हे तर त्याच्या आजीच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसून येत आहे.

क्युटनेसचा खजिना असलेला तैमूरचे अनेक फॅन असून त्याची एक झलक दिसावी यासाठी त्याचे चाहते कसोशीने प्रयत्न करत असतात.तैमूर जेथे जाईल तेथून तो चाहत्यांच्या दृष्टीस पडतो आणि त्याचे फोटो क्षणार्थात व्हायरल होतात. तैमूर नुकताच प्लेगृपमध्ये जायला लागला आहे आणि त्याचे शाळेतले हे फोटोदेखील व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, तैमूरची लोकप्रियता पाहता आता त्याच्या आजीला म्हणजेच शर्मिला टागोर यांना तैमूरचा हेवा वाटायला लागला आहे असं दिसून येत आहे. झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शर्मिला यांनी स्वत: याबद्दल त्यांच मत व्यक्त केलं आहे.

‘तैमूरची लोकप्रियता आणि क्युटनेस पाहून लोक त्याच्याकडे जास्त आकर्षित होतात. तो चाहत्यांना आवडत आहे. त्यामुळे सध्या तो प्रचंड लोकप्रिय असून लोकप्रियतेच्या घोडदौडेमध्ये त्याने मला सुद्धा मागे टाकलं आहे’, असं शर्मिला म्हणाल्या. आपल्या नातवाची लोकप्रियता पाहता आजी शर्मिला खुश असून त्यांना तैमुरचा हेवा वाटत आहे. त्यातच तैमूरची लोकप्रियता कायम अशीच टिकून रहावी असंदेखील त्यांना वाटत असल्याचं त्यांच्या बोलण्यावर दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sharmila tagore happy grandmother of timurs publicity