स्वत: च्या लग्नात ३ तास उशिरा पोहोचले होते शत्रुघ्न सिन्हा!

५ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चंडीरमानी या दोघांनी १९८० मध्ये लग्न केले.

shatrughan sinha, shaturghan sinha marriage,
५ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी १९८० मध्ये लग्न केले.

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी ७० ते ८० चे दक्षक गाजवले आहे. शत्रुघ्न हे फक्त त्यांच्या अभिनयासाठीच नाही तर उशिरा येणाच्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असायचे. शत्रुघ्य यांना कोणत्याही ठिकाणी उशिरा जाण्याची सवय होती की ते स्वत: च्या लग्नाला ३ तास उशिरा पोहोचले होते. एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या पॅनल डिस्कशन दरम्यान शत्रुघ्न यांनी या विषयी सांगितले आहे. शत्रुघ्न चित्रपटाच्या सेटवर नेहमीच उशिरा पोहोचायचे ते कधी वेळेत पोहोलचे नाही. ‘मी माझ्या स्वत: च्या लग्नात ३ तास उशिरा पोहोचलो होतो’, असे शत्रुघ्न म्हणाले. शत्रुघ्न यांनी अभिनेत्री पूनम चंडीरमानी यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर पूनम यांनी नाव बदलून पूनम सिन्हा केले. ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी १९८० मध्ये लग्न केले.

आणखी वाचा : नागा चैतन्यच्या ‘पहिल्या पत्नी’ विषयी समांथाने केला होता खुलासा

सेटवर उशिरा येण्याचा किस्सा सांगत शत्रुघ्न म्हणाले, ‘मी सेटवर खूप उशिरा पोहोचायचो. पण मला सगळी काम वेळेत संपवण्यासाठी ही ओळखले जाते. सेटवर उशिरा पोहोचत असलो तरी मी वेळेच्या आधीच काम पूर्ण करायचोय.’

आणखी वाचा : करीनाने शेअर केला बिकिनीमधील मिरर सेल्फी; कॅप्शनमध्ये म्हणाली, “चला उन्हाळा…”

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘मी कधीही कुणाला त्रास दिला नाही किंवा नखरे दाखवले नाही. मी कधीही असे म्हटले नाही की आज मला शूट करण्याची इच्छा नाही. कधीच असे घडले नाही की मी आउटडोअर शूटसाठी पोहोचलो नाही. खरं तर, मला कधी ताप आला तरी मी सेटवर पोहचत असे.’ शत्रुघ्य हे स्वत: सेटवर उशिरा पोहोचत असले तरी त्यांनी सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेले जे कलाकार वेळेवर सेटवर पोहोचतात त्यांची स्तुती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shatrughan sinha reveals he reached 3 hours late at his own wedding with poonam sinha and never cancelled any shoot dcp

फोटो गॅलरी