अभिनेते आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सध्या चर्चेत असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत आपल्याला आपल्या तिन्ही मुलांचा अभिमान वाटतो, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी बॉलिवूड आणि ड्रग्जची समस्या याविषयावरही भाष्य केलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडच्या ड्रग्ज वापराबद्दल म्हणाले, हे कदाचित आव्हानात्मक असेल, पण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला हवं. माझं आधीपासूनच हे स्पष्ट म्हणणं आहे. मी तंबाखूविरोधी मोहिमेचं समर्थन करतो. व्यसनांना, ड्रग्जला नाही म्हणा हे माझं सतत म्हणणं आहे.

आणखी वाचा – “तो नशीबवान होता म्हणून नाहीतर…”, आर्यन खानच्या जामिनानंतर वकील सतीश मानेशिंदेंचं मोठं वक्तव्य

आपलं व्यस्त वेळापत्रक सांभाळून मुलांना समजावायला, त्यांना मार्गदर्शन करायला बॉलिवूड सेलिब्रिटींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, आज मी स्वतःला या बाबतीत नशीबवान समजतो. मला तीन मुलं आहेत, लव,कुश आणि सोनाक्षी. या तिघांनाही मी खूप चांगल्या पद्धतीने मोठं केलेलं आहे हे मी आज गर्वाने सांगतो. या तिघांनाही अशा पद्धतीची कोणतीही वाईट सवय किंवा अशा काही प्रकरणात यांचा कधीही सहभाग असेल, ते असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही.

हेही वाचा – “त्यांनी हे प्रकरण खूपच…”; आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी यांचे NCB वर गंभीर आरोप

पालकत्वाचा सल्ला देताना सिन्हा यांनी सांगितलं की आपली मुलं एकटी पडत नाहीत ना याची काळजी घ्या. ते कोणत्याही वाईट संगतीत नाही ना, त्यांना वाईट सवयी लागत नाहीयेत ना याकडे लक्ष द्या.

आर्यन खान प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले, “स्टार कीड आहे म्हणून त्याला माफ करुन सोडून देणं किंवा त्याला लक्ष्य करणं हे दोन्ही चुकीचंच आहे. न्याय व्हायलाच हवा आणि तो झाला”.