scorecardresearch

Premium

‘त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय..’ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली केआरकेची पाठराखण

मागच्या आठवड्याभरात केआरकेला दोन वेळा अटक झाली आहे.

KRK, Kamal rashid khan, Shatrughan Sinha, Conspiracy, Victim, KRK arrest, FIR, Versova police, Controversy, कमाल आर खान, शत्रुघ्न सिन्हा
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या संपूर्ण परिस्थितीवर आपले मत मांडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र अभिनेता केआरकेच्या नावाची चर्चा होत आहे. केआरके म्हणजेच ‘कमाल राशिद खान’ त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर फार सक्रीय आहे. अनेक वादग्रस्त ट्वीट्समुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. केआरकेने दिवंगत अभिनेते इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल ट्वीट केले होते. याप्रकरणामुळे तो कायद्याच्या कचाट्यात सापडला. आक्षेपार्ह ट्विट्समुळे केआरकेला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली.

हा खटला सुरू असतानाच केआरकेला छेडछाडीच्या प्रकरणावरुन पुन्हा अटक झाली. एका नवोदीत अभिनेत्रीला घरी बोलावून तिची छेड काढल्याच्या आरोपावरुन वर्सोवा पोलिसांनी केआरकेवर कारवाई केली. या छेडछाडीच्या प्रकरणामुळे त्याला नव्या कायदेशीर आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या संपूर्ण परिस्थितीवर आपले मत मांडले. त्यांनी ट्विट करत केआरकेची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘केआरकेला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा- छेडछाडीचं प्रकरण भोवलं; केआरकेला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

Shinde Fadnavis Pawar
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…
devendra fadnavis (1)
“जेव्हा पक्ष सांगेल, तुझी गरज नाही आता…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
stranded passengers near panvel station get immediate help after chief minister call
नवी मुंबई : ८ ते १० तास ट्रेन एकाच ठिकाणी थांबलेली, वैतागलेल्या प्रवाशाचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, पुढे काय झालं?

शत्रुघ्न सिन्हा अभिनयक्षेत्रासह राजकारणात देखील सक्रीय आहेत. ते सोशल मीडियावर नेहमी व्यक्त होत असतात. केआरकेबद्दल त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘केआरकेने खूप संघर्ष करुन या क्षेत्रात नाव कमावले आहे. असंख्य संकटांचा सामना करत तो इथवर पोहोचला हे कोणीही विसरु नये. त्याने स्वत:च्या जीवावर ओळख निर्माण केली आहे. देवाच्या आशीर्वादाने त्याने चित्रपटसृष्टी आणि समाजात आपले स्थान तयार केले आहे.’

आणखी वाचा- लांब केस, डोळ्यावर चष्मा अन्… सलमानच्या ‘या’ बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीझर चर्चेत

या ट्वीट मागोमाग त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे. त्यांनी लिहिलं, ‘अनेकांचा विरोध सहन करून केआरके आपले मत व्यक्त करत असतो. कायद्याच्या चौकटीमध्ये राहून बोलण्याचा त्याला हक्क आहे. तो आसपासच्या परिस्थितीचा शिकार झाला आहे. कमाल राशिद खानला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी मी आशा करतो.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shatrughan sinha take side of krk says they trying to trap him mrj

First published on: 06-09-2022 at 14:33 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×