Parag Tyagi Emotional Post For Wife Shefali Jariwala : ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली जरीवाला हिचे २७ जूनच्या रात्री निधन झाले. तिच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफालीचे जाणे तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता.
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचा पती पराग त्यागीचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले. पराग आणि शेफाली एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि अभिनेत्रीच्या निधनानंतर परागचे मन दुखावले आहे.
अजूनही पराग त्या धक्क्यातून सावरू शकलेला नाही आणि त्याला त्याच्या पत्नीची खूप आठवण येत आहे. शेफाली जरीवालाच्या आकस्मिक निधनाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. परागने इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीबरोबरचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत आणि एक भावनिक कॅप्शन लिहिली आहे.
“परी.. मी तुला प्रत्येक जन्मात शोधेन” : पराग त्यागी
पराग त्यागीने शेफाली जरीवालाबरोबर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये दोघेही बेडवर आराम करत आहेत आणि दुसरा फोटो एका क्लबचा दिसतो जिथे पराग त्याच्या पत्नीला किस करत आहे. तिसरा फोटो स्विमिंग पूलचा आहे आणि चौथा फोटो परदेश प्रवासादरम्यान काढलेला आहे. परागने त्याच्या पोस्टमध्ये एक खूप जुना फोटोदेखील शेअर केला आहे. परागने बॅकग्राउंडमध्ये एक भावनिक गाणे टाकले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तु जेव्हा जेव्हा जन्माला येशील त्या प्रत्येक वेळी मी तुला शोधेन.”
पराग त्यागीने पुढे लिहिले, “प्रत्येक जन्मात मी तुझ्यावर प्रेम करेन.मेरी गुंडी, मेरी छोकरी.” पराग त्यागीच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत आणि त्याला धैर्य ठेवण्यास सांगितले आहे.
‘कांटा लगा’ या रिमिक्स ट्रॅकमध्ये तिच्या धमाल डान्ससाठी प्रसिद्ध झालेल्या शेफालीचे २७ जून रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. परागने तिला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तातडीने नेले. मात्र, तेथे पोहोचल्यावर तिला मृत घोषित करण्यात आले.
शेफाली आणि परागचे लग्न
शेफाली आणि पराग २०१० मध्ये भेटले आणि २०१४ मध्ये लग्न करण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे डेट केले. ते प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘नच बलिये’मध्ये एकत्र दिसले होते.