scorecardresearch

VIDEO : शहनाज गिलची खान कुटुंबियांशी जवळीक वाढली, पार्टीमधील ‘तो’ व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल आता सलमान खानच्या कुटुंबासोबत चांगलीच रुळलेली दिसत आहे. एका पार्टीदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

shehnaaz gill latest news, shehnaaz gill at giorgia andriani birthday bash
'बिग बॉस' फेम शहनाज गिल आता सलमान खानच्या कुटुंबासोबत चांगलीच रुळलेली दिसत आहे. एका पार्टीदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’ फेम शहनाज गिल सध्या भलतीच चर्चेत असते. सलमान खानने त्याच्या बहुचर्चित ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये काम करण्याची शहनाज संधी दिली. त्यानंतर शहनाज अगदी टॉक ऑफ द टाऊन ठरली. आता ती खान कुटुंबियांच्या प्रत्येक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसते. मध्यंतरी सलमानची बहिण अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईद पार्टीलाही ती हजर होती. आता तर चक्क अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी हिच्या बर्थ डे पार्टीला शहनाज उपस्थिती होती. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अरबाजच्या गर्लफ्रेंडने तिच्या बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी शहनाजचीच अधिकाधिक चर्चा रंगली. यावेळी शहनाजने अरबाजबरोबर देखील खूप मजा-मस्ती केली. तसेच शहनाज जॉर्जियाला अगदी प्रेमाने केक भरवतानाचे व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहताना दोघींमध्ये किती घट्ट मैत्री आहे हे स्पष्टपणे दिसून येतं.

आणखी वाचा – अभिनेत्री कंगना रणौतला झटका, कोट्यावधी रुपये खर्च करूनही ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप

खान कुटुंबियांसोबत तिचे व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओ पाहता ती या कुटुंबाचीच आता एक सदस्य झाली असल्याचं दिसून येत आहे. अरबाजबरोबर देखील तिची मजा-मस्ती पाहता ती या कुटुंबामध्ये रुळली असल्याचं बोललं जात आहे. कलाकसृष्टीमध्ये स्वतःच स्थान बळकट करण्यासाठी ती सध्या मेहनत घेत आहे. सलमानच्या चित्रपटामध्ये काम करणं म्हणजे तिच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

आणखी वाचा – “देशाला विभागू नका कारण…” बॉलिवूड विरूद्ध साऊथ वादावर अखेर अक्षय कुमारने सोडलं मौन

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पुरती खचलेली शहनाज आता मात्र सावरली आहे. तिच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखंच हास्य आता पाहायला मिळतं. इतकंच नव्हे तर तिचे व्हायरल फोटो पाहून चाहते देखील प्रचंड खूश होतात. सोशल मीडियावर तर लाखोच्या घरात तिचे फॉलोवर्स आहेत. शहनाजला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी ती सध्या प्रयत्न करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shehnaaz gill at giorgia andriani birthday party meet with arbaaz khan video viral on social media kmd

ताज्या बातम्या