‘हौसला रख’ सिनेमच्या प्रमोशनवेळी सिद्धार्थच्या आठवणीत शेहनाजला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी शेहनाजचं सांत्वन केलंय.

shehnaaz-gill
(Photo-Youtube)

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनांतर अजूनही त्याचे चाहते त्याला विसरू शकलेले नाहित. सिद्धार्थच्या आठवणीत आजही अनेक चाहते सोशल मीडियावर त्याचे रील्स शेअर करत आहेत. तर दुसरीकडे शेहनाज गिल या दु:खातून अद्याप सावरलेली नाही. नुकताच शेहनाजचा एक व्हि़डीओ व्हायरल होत असून यात ती सिद्धार्थच्या आठवणीत रडताना दिसतेय.

शेहनाजचा हा व्हिडीओ पाहून सिडनाजचे चाहते भावूक होत आहेत. या व्हिडीओत शेहनाज ढसाढसा रडताना दिसतेय. हा व्हिडीओ शेहनाजचा सिनेमा ‘हौंसला रख’ च्या प्रमोशनचा आहे. यावेळी तिच्या शेजारी बसलेला दिलजीत दोसांज तिचं सांत्वन करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी शेहनाजचं सांत्वन केलंय. आम्ही तुझ्यासोबत आहोत असं चाहते म्हणाले आहेत.

“हिंदूस्तान का शेर आ रहा है”, अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज

लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल प्रश्न विचारल्याने रचिता राम वादात, अभिनेत्रीवर बंदी घालण्याची कन्नड क्रांती दलाची मागणी

शेहनाज गिलचा जवळचा मित्र सिद्धार्थ शुक्लाचं जवळपास दोन महिन्यांपूर्वीच निधन झालं. सिद्धार्थ आणि शेहनाज याचं खास नात होतं. दोघं लग्न करणार अशाही चर्चा सुरु होत्या. मात्र यावर दोघांनी शिक्का मोर्तब केलं नव्हत. ‘बिग बॉस’ शोमध्ये शेहनाज आणि सिद्धार्थची मैत्री झाली होती. त्यानंतर दोघं काही अल्बममध्येही झळकले होते. दोघांच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी पसंती दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shehnaaz gill cried during honsla rakh promotion for sidharth shukla video goes viral kpw

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या