बिग बॉस फेम शहनाझ गिलच्या आयुष्यातील समस्या संपण्याचं नावच घेत नाही आहेत. एकीकडे सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर हळूहळू शहनाज सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आता शहनाझचे वडील संतोख सिंह सुख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरवरून ब्यास येथे जात असताना शहनाझच्या वडीलांवर दुचाकीस्वारांनी हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार शहनाझचे वडील अमृतसर ते ब्यास असा प्रवास करत होते. दरम्यान त्यांनी एका धाब्यावर आपली गाडी थांबवली. त्यावेळी काही दुचाकीस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार करत जीवघेणा हल्ला केला.

Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
narayan rane On uddhav thackeray
“आम्ही मातोश्रीवर भेट द्यायचो तेव्हा प्रसाद घेऊन जावा लागायचा, मग तो काळा पैसा नव्हता का?”; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी
Delhi aap
आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, भाजपाही केजरीवालांच्या राजीनाम्यावर ठाम; दिल्लीत सत्ताधारी-विरोधकांची निदर्शने!

शहनाझचे वडील संतोख सिंह सुख यांनी सांगितलं, ‘मी वॉशरुमला जाण्यासाठी एका धाब्याजवळ गाडी थांबवली. माझे बाउंसरही माझ्यासोबत होते. तेवढ्यात एक दुचाकी माझ्या बाजूने आली आणि या दुचाकीवरील युवकांनी माझ्यावर गोळीबार केला. हे पाहिल्यावर माझे बाउंसर धावत आले पण तोपर्यंत ते युवक पळून गेले होते.’

दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यातून शहनाझ गिलचे वडील बचावले आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की, याबाबत पोलिसांनी मात्र कोणतीही कारवाई केलेली नाही. तर पोलिसांचं म्हणणं आहे की, संतोख सिंह सुख यांनी तक्रार दाखल केली आहे आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शहनाझच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.