scorecardresearch

शहनाझ गिलचं सलमान खानशी बिनसलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

शहनाझ गिल सलमानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.

शहनाझ गिलचं सलमान खानशी बिनसलं? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सलमान खान आणि शहनाझ गिल यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

सलमान खानचा आगामी ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे. या चित्रपटाबद्दल चाहते खूपच उत्सुक आहेत कारण ‘बिग बॉस’ फेम शहनाझ गिल याद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा आहेत. पण आता या चित्रपटाशी संबंधित नुकतीच नवी माहिती समोर येत आहे ज्यामुळे शहनाझच्या चाहत्यांशी निराशा होऊ शकते. सलमान खान आणि शहनाझ गिल यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी शहनाझला चित्रपटातून काढून टाकल्याचं वृत्त आहे. सलमान आणि शहनाझ यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. तसेच चित्रपटातून बाहेर पडताच शहनाझने राग व्यक्त करत सलमान खानला सोशल मीडियावर अनफॉलो केल्याचंही बोललं जात होतं. मात्र यात तथ्य नाही. अद्याप यावर चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा शहनाझ आणि सलमानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आणखी वाचा- कसा आहे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’? दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा- गँगस्टर्सकडून जीवे मारण्याची धमकी, सलमान खानला मिळाला शस्त्र परवाना

दरम्यान ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार शहनाझ गिल सुरुवातीपासून ‘कभी ईद कभी दिवाळी’ चित्रपटाचा भाग आहे. शहनाझ गिलला ‘कभी ईद कभी दिवाळी’मधून बाहेर काढलेलं नाही. तिच्याबद्दल चित्रपटातून बाहेर काढल्याच्या बातम्या केवळ अफवा असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. शहनाझने या वर्षाच्या सुरुवातीला ‘कभी ईद कभी दिवाळी’चे शूटिंग सुरू केले होते. या चित्रपटातून राघव जुयाल सुद्धा शहनाझसोबतच बॉलिवूड पदार्पण करत आहे. तसेच पलक तिवारी आणि सिद्धार्थ निगम यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shehnaaz gill salman khan fight rumours goes viral on social media mrj

ताज्या बातम्या