प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. सध्या शेर शिवराज हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. मात्र या चित्रपटाला प्राईम टाईम न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर सर्वात आधी अभिनेता अक्षय वाघमारेनं भाष्य केलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेता आस्ताद काळेनंही संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

आस्ताद काळेनं त्याच्या फेसबुकवर शेर शिवराज चित्रपटाला मिळलेल्या स्क्रिनिंग टाइमचे काही स्क्रिनशॉट शेअर करत पोस्ट लिहिली आहे. यात त्यानं मराठी चित्रपटांना प्राइम टाइम मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘जून किती वर्षं “महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमधे मराठी चित्रपटांनाच योग्य स्थान मिळत नाही” या गोष्टीचा त्रास सहन करायचाय??? किती वर्षं?????’

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

आणखी वाचा- श्वेता तिवारीच्या वैवाहिक जीवनाबद्दल मुलगी पलकचा मोठा खुलासा, म्हणाली…

आस्ताद काळेची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक युजर्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही हा चित्रपट पाहणार असं काही युजर्सचं म्हणणं आहे. काहींच्या मते मराठीमध्ये दर्जेदार चित्रपट तयार केले जात नाहीत म्हणून त्यांना प्राइम टाइममध्ये स्थान मिळत नाही. तर काही युजर्सनी आस्ताद काळेला पाठिंबा देत त्याचं म्हणणं बरोबर असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान याच मुद्द्यावरून अभिनेता अक्षय वाघमारेनंही इन्स्टाग्राामवर पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत होती. आपल्या पोस्टमध्ये त्यानं, ‘मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही.’ अशी खंत व्यक्त केली होती.