काही कलाकार आपल्या कामामुळे नाही, तर वादांमुळे चर्चेत राहतात. राखी सावंत, आदिल खान, पूनम पांडे, शर्लिन चोप्रा ही त्यापैकीच काही नावं आहेत. शर्लिन चोप्रा ही तिच्या बोल्ड कपड्यांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने काही दिवसांपूर्वी ब्रेस्ट इंप्लांट काढले होते. तेव्हा तिची बरीच चर्चा झाली होती. त्याचबरोबर शर्लिन व राखी सावंत यांची भांडणंही खूप गाजली होती.

शर्लिन चोप्रा ही तिच्या कामामुळे लोकप्रियता मिळवू शकली नाही. त्यामुळे ती वादग्रस्त वक्तव्ये व बोल्ड कपड्यांमुळे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. शर्लिन चोप्राने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये एक मोठी कबुली दिली होती. भूतकाळात तिने पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवल्याचं मान्य केलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिने हा मार्ग निवडला होता, असं तिने सांगितलं होतं.

शर्लिन चोप्राने दिलेली जाहीर कबुली

“मला पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंधांसाठी अनेक वेळा विचारण्यात आलं आहे. मी यापूर्वीही पैशांसाठी संबंध ठेवले आहेत. हा खुलासा मी स्वतःची प्रतिमा बिचारी किंवा चांगली वा वाईट करण्यासाठी करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतेय की आजही लोक माझ्याशी शारीरिक संबंधांसाठी संपर्क साधतात, पण मी आता ते करत नाही,” असं शर्लिन चोप्राने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

शर्लिनने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं होतं की आता अशा गोष्टींसाठी तिच्याशी कोणीही संपर्क साधू नये. तसेच, तिने आधी पैशांसाठी ज्यांच्याबरोबर संबंध ठेवले होते, ते लोक तिला आठवत नाहीत.

चित्रपटसृष्टीत काम मिळवणे कठीण होते आणि मुंबईसारख्या शहरात टिकून राहण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून हा पर्याय निवडल्याचं शर्लिन चोप्राने म्हटलं होतं. तिने स्वतःच्या कृतीचं समर्थन केलं नाही, परंतु तिने तिची सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली होती.

शर्लिन चोप्राच्या या खुलाशाने सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झाल्यास शर्लिन चोप्राने तिच्या करिअरमध्ये ‘कामसूत्र 3D,’ ‘खेल’ आणि ‘चमेली’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.