Video: ‘येडा बनके पेडा खाना…’, शर्लिन चोप्राने साधला शिल्पा शेट्टीवर निशाणा

शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे जबाब नोंदवताच शर्लिनने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sherlyn Chopra, Shilpa Shetty, Shilpa Shetty statement, Raj Kundra, pornography case,

पॉर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा सध्या तरुंगात आहे. अश्लील चित्रपट तयार करुन ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसात जबाब नोंदवला आहे. ‘कामात व्यस्त असल्याने राज काय करतो माहित नाही’ असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांना दिला आहे. त्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्राने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शर्लिनने राज कुंद्रावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर शिल्पाने पोलिसात जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीदीचे म्हणणे आहे की कामात व्यस्त असल्याने राज काय करतो याविषयी माहिती नाही. इतकेच नाही तर पतीच्या संपत्तीचा स्त्रोत काय आहे याबद्दल देखील माहिती नसल्याचे शिल्पा म्हणाली. यात किती सत्य आहे हे तुम्हीच ठरवा. याला म्हणतात दीदी येडा बनाके पेडा खाना…’ ती असे बोलताना दिसते.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी?

राज कुंद्रा यांने २०१५ मध्ये “विआन इंडस्ट्रीज ली.’ नावाची कंपनी सुरू केली होती. त्या कंपनीमध्ये शिल्पा शेट्टीचे २४.५० टक्के समभाग होते. या कंपनीत शिल्पा एप्रिल २०१५ ते जुलै २०२० या कालावधीत संचालक पदावर होती. त्यानंतर तिने वैयक्तिक कारणास्तव संचालकपदाचा राजीनामा दिला असल्याचे साक्षीत सांगितले. हॉटशॉट अ‍ॅप व बॉली फेम या संदर्भात आपल्याला काही माहिती नसल्याचे तिने सांगितले. कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा काय करतो त्यांना माहिती नसल्याचे शिल्पाने जबाबात सांगितले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sherlyn chopra on shilpa shetty statement in raj kundra pornography case avb