बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. दरम्यान अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर शिल्पा आणि राजने हे आरोप खोटे असल्याचे म्हणत शर्लिन विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला. तसेच ५० कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मागणी केली होती. त्यांच्या या नोटीशीवर शर्लिनने ट्वीट करत उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्लिनने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शिल्पा आणि राजने केलेल्या तक्रारीवर उत्तर दिल्याचे सांगितले आहे. ‘रिपु सूदन उर्फ राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांनी माझ्या विरोधात केलेल्या मानहानीच्या नोटीशीला माझ्या लीगल टीमने २३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर दिले आहे. मी दिलेल्या जवाबातील पहिल्या आणि शेवटच्या पानाचा हा फोटो’ या आशयाचे ट्वीट शर्लिनने केले होते.

काय होते शर्लिनचे आरोप?
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शर्लिनने सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक आरोप केले होते. राज कुंद्राने फसवणूक केली असून शारीरिक शोषण केल्याचा आरोप शर्लिनने केला होता. एप्रिल २०२१मध्ये देखील शर्लिनने राज विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. राज कुंद्रा प्रकरणामध्ये क्राइम ब्रांचने शर्लिनची चौकशी केली होती. या प्रकरणातील ती महत्त्वाची साक्षीदार असल्याचे म्हटले जात होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sherlyn chopra shares reply notice sent to raj kundra and shilpa shetty defamation case avb
First published on: 27-10-2021 at 12:55 IST