‘तू अहंकारी आहेस’ म्हणणाऱ्या लोकांना कियारा आडवाणीने दिले उत्तर

‘एम.एस.धोनी’ चित्रपटातून कियाराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

kiara
Photo-Kiara Adwani

भारतातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आता कियारा आडवाणीचा समावेश झाला आहे. तिच्या मनमोहक सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. ती ‘लस्ट-स्टोरी’ मधी बोल्ड भूमिका असो किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘शेरशाहा’मधील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीची भूमिका. प्रत्येक भूमिकेत तिच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.

नुकताच कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ‘शेरशाहा’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळताना दिसतं आहे. तसंच आता कियाराच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. असं म्हटलं जातं की प्रसिद्धी बरोबर माणसाची वृती बदलते. त्यामुळे आता काही लोकांचे मतं असे झाले आहे की कियाराला प्रसिद्धि मिळाल्यापासून ती खूप अहंकार दाखवते आहे असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. कियाराने या बद्दल स्पष्टीकरण देत एका मुलाखतीत तिचे मतं मांडले आहे. कियारा “तू अहंकारी आहेस” अशा लोकांच्या वक्तव्यावर बोलताना तिने सांगितले की, “लोक माध्यमांमध्ये लेख वाचून त्यांची मतं तयार करतात. केवळ मी काही प्रोजेक्ट्ससाठी नकार दिला म्हणजे मी अहंकारी होणार का? लोकांनी माझ्या बद्दल गैरसमज तयार केला आहे.”

कियारा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रींपैकी एक आहे. ती लवकरच राम चरण- शंकरचा तेलगू चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटासाठी कियाराने खूप मोठी रक्कम घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गेल्यावर्षी कियाराने डब्बू रतनानीसाठी एक टॉपलेस फोटोशूट केलं होतं. कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरही हा टॉपलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवर काहींनी कौतुक केलं होते तर अनेकांनी कियाराला ट्रोलही केलं होतं. यावेळी कियाराचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shershaah fame actress kiara adwani slams the trollers who says she is arrogant aad

ताज्या बातम्या