कुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले, “थोडं ट्रेनिंग आपल्या….”

शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

shilpa shetty, shilpa shetty troll,
शिल्पाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Photo Credit : Varinder Chawla Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे शिल्पाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

शिल्पाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाने पांढऱ्या रंगाच डेनिम जॅकेट परिधान केलं आहे. शिल्पाच्या आजुबाजूला रस्त्यावरील भटके कुत्रे दिसत आहेत. मात्र, सगळ्यांचं लक्ष हे शिल्पाने दिलेल्या पोजने वेधले आहे. शिल्पाने फिल्म सिटीमध्ये असलेल्या या कुत्र्यांसोबत फोटो काढले आहेत. यावेळी काही नेटकऱ्यांनी तिला पशु प्रेमी म्हटलं तर काहींनी तिला राज कुंद्राच्या नावावरून ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : ‘मुकुल रोहतगी यांच्यासारख्या वकिलाकडे…’, आर्यन खानच्या सुटकेनंतर राम गोपाल वर्मांचे ट्वीट चर्चेत

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

शिल्पाचा हा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “कुंद्राला ट्रेनिंग दे त्याला गरज आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “तिचा नवरा कुठे आहे.” तिसरा नेटकरी म्हणाला, “रेड कार्पेट ठीक आहे, पण तिच्या पतीच्या पॉर्न फिल्म्सचं काय.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “यापैकी कुंद्रा कोणता आहे?” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty after poses with stray dogs trolls train your husband dcp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या