शिल्पा शेट्टी देखील करते ‘पावरी’, पतीसोबत शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर ‘pawari ho rahi hai’ असे म्हणत एका मुलीने शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड सुरु झाला. यावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले. या मेजशीर ट्रेंडमध्ये सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील पावरी हो रही है असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राजने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, ‘ये हमारा ब्रेकफास्ट है, ये हमारा व्यू है, और ये हमारी पार्टी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

आणखी वाचा: शिल्पा शेट्टीची मुलगी झाली एका वर्षाची; शेअर केलेला व्हिडीओ बघितला का?

राजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज मालदीवला असल्याचे दिसत आहे. ते तेथे बसून ब्रेकफास्ट करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र-मैत्रीणी देखील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘पावरी हो रही है’ असे कॅप्शन दिले आहे. राज आणि शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटर Dananeer हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. Dananeer ने हा व्हिडीओ ६ फेब्रुवारी रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओत ती ‘ये में हूं, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. Dananeer चा पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. फक्त नेटकऱ्यांनी नाही तर नेटफ्लिक्सपासून डॉमिनॉज, पीआयबी फॅक्टचेक, झोमॅटोपर्यंत अनेकांनी हे मीम्स शेअर केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty and raj kundra pawri ho rahi hai trend video funny avb