‘देखा, योगा से ही होगा’ म्हणत शिल्पा शेट्टीने दिल्या शुभेच्छा, मोदी म्हणाले..

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर सेलिब्रिटींनीही मोदींचे अभिनंदन केले आहे.

Modi-&-shilpa
नरेंद्र मोदी, शिल्पा शेट्टी

लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं. २०१४चीच पुनरावृत्ती करत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर जागतिक नेत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही मोदींचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनोख्या पद्धतीने मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

फिटनेससंदर्भात शिल्पा नेहमीच सजग असते. योग, प्राणायाम करण्याचं आवाहन ती चाहत्यांना करत असते. मोदींचा योग करतानाचा फोटो शेअर करत शिल्पाने लिहिलं, ‘देखा योगा से ही होगा. इसे कहते है, भूमी भंजन इलेक्शन प्रदर्शन. बहुत बधाई हो आपको नरेंद्र मोदीजी. आपको मेरा साष्टांग दंडवत प्रणाम.’ यासोबतच तिने ‘मोदी त्सुनामी’ हा हॅशटॅग वापरला आहे. या ट्विटसाठी मोदींनीही शिल्पाचे आभार मानले आहेत.

वाचा : गलती से मिस्टेक? विवेकने मोदींसाठी केले ट्विट, सलमानच्या सिनेमाचे झाले प्रमोशन  

शिल्पा सध्या ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक आहे. शोमध्ये एखाद्या स्पर्धकाचा डान्स आवडल्यास ‘भूमी भंजन नृत्य प्रदर्शन’ अशा शब्दांत शिल्पा कौतुक करते. त्यामुळे याच अंदाजात तिने आता मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty congratulates pm narendra modi in a unique way and modi replies

ताज्या बातम्या