दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी शनिवारी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. दीड दिवसांच्या पाहुणचारानंतर रविवारी शिल्पाने गणपती बाप्पाचे विर्सजन केले. शिल्पाने पती राज कुंद्रा आणि मुलासोबत घरच्या घरी गणपतीचे विसर्जन केले आहे. दरम्यान तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

वूंम्प्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिल्पाचे गणपती विसर्जन करतानाचे व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. विसर्जन करताना शिल्पा पती आणि मुलासोबत डान्स करताना दिसत आहे. तिचा हा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गणपती विसर्जनासाठी शिल्पाने पारंपरिक कपडे परिधान केले होते. तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिने पिवळ्या आणि क्रीम रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. सध्या तिचे हे गणपती विसर्जनाचे व्हिडीओ चर्चेत आहेत.

गणपती विसर्जन झाल्यानंतर शिल्पाने तेथे उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सला बाप्पाचा प्रसाद देखील दिला आहे. व्हिडीओमध्ये शिल्पा दोन डिशमध्ये प्रसाद आणते आणि फोटोग्राफर्सला देताना दिसते.

जवळपास १२ वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून लांब असणारी शिल्पा पुन्हा पुनरागमन करणार आहे. ती ‘हंगामा २’ आणि ‘निकम्मा’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहे. या आधी तिने २००७मध्ये ‘अपने’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र, बॉबी देओल, सनी देओल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ती पाहूण्या कलकाराच्या भूमिकेत ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील टायटल ट्रॅक, दोस्तानामधील ‘शट आप अॅन्ड बाऊन्स’ गाणे आणि २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तू मेरे टाईप का नही है’ या गाण्यात झळकली होती.