“बदाम खाल्ल्याने शहाणपण मिळत नाही तर…”, गायकाने भर शोमध्ये उडवली शिल्पा शेट्टीची खिल्ली

सध्या या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी यंदाचे वर्ष हे फार चर्चेत गेले आहे. तिचा पती उद्योगपती राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. सध्या शिल्पा शेट्टी ही इंडिया गॉट टॅलेंट या शो मध्ये परिक्षक म्हणून काम करत आहेत. यात शिल्पासोबत गायक मनोज मुंतशिरही दिसत आहे. सध्या या कार्यक्रमातील तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

नुकतंच मनोज मुंतशिर यांनी शिल्पासोबतच एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओचे शूटींग हे इंडिया गॉट टॅलेंट या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले आहे. या व्हिडीओत शिल्पा आणि मनोज एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसत आहे. यावेळी ती बदाम खाताना दिसत आहे.

यावेळी मनोज तिला टोमणा मारतो आणि म्हणतो, “शिल्पा जी, शहाणपण हे बदाम खाऊन मिळत नाही, धोका खाल्ल्याने मिळते.” यावर शिल्पा थोडं विचार करुन उत्तर देते. यावेळी शिल्पा म्हणते की, “अच्छा, म्हणजे तू बदाम धोके (धुवून) खात नाहीस का?” असा प्रश्न ती विचारते. यावर मनोज हा फार विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

शिल्पा आणि मनोज या दोघांनीही हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगला व्हायरल होता आहे. तसेच या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

‘सोनी टीव्ही’वर प्रसारित होणाऱ्या ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या शो चा नववा सीझन सुरु आहे. यापूर्वी हा शो ‘कलर्स टिव्ही’वर चॅनेलवर प्रसारित केले जात आहे. या शो मध्ये शेखर कपूर, सोनाली बेंद्रे, धर्मेंद्र, किरण खेर, मलायका अरोरा, फराह खान आणि करण जोहर हे परिक्षक म्हणून झळकले आहेत. यानंतर आता नवव्या सीझनमध्ये शिल्पा आणि मनोजसोबत बादशाह हा परिक्षक म्हणून सहभागी होणार आहे. तर अर्जुन बिजलानी हा शो होस्ट करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty eating almond during show manoj muntashir video viral nrp