बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही महिन्यांपासून पॉर्नोग्राफी केसमुळे चर्चेत आहे. १९ जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. जवळपास २ महिन्यांनंतर मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून राज कुंद्राला जामीन मंजूर केला. आता एका पत्रकार परिषदेत शिल्पाला पती संबंधी प्रश्न विचारल्यामुळे ती संतापली आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत शिल्पा शेट्टीला राज कुंद्रासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर तिने उत्तर देण्यास नकार दिला. शिल्पा म्हणाली, ‘मी राज कुंद्रा आहे का? मी त्याच्यासारखी वाटते का? नाही नाही सांगा, मी कोण आहे?’ शिल्पाने हे सर्व हसत म्हटले. पण राज कुंद्राचे नाव घेताच ती सुरुवातीला संतापली असल्याचे सर्वांनी पाहिले.

आणखी वाचा : अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्राचा थाट; आलिशान घर पाहिलेत का?

त्यानंतरही शिल्पाला यावर बोलण्यास सांगितले होते. ‘मला असे वाटते की मी एक सेलिब्रिटी असल्यामुळे कोणाची तक्रार करायला नको किंवा कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यायला नको. हिच माझ्या आयुष्याची फिलॉसफी आहे’ असे शिल्पाने म्हटले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी बराच वेळ घरात होती. त्यानंतर तिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत होता. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले होते. आता त्याला जामीन मंजुर झाला आहे.