शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असा दावा केला जात आहे की, एका मुलीने तिला रेस्टॉरंटमध्ये हळू बोलण्यास सांगितले तेव्हा शिल्पा शेट्टी भांडायला लागली.

आता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने या व्हायरल व्हिडीओवर आपली बाजू मांडली आहे. तो म्हणतो की, एक टेबल डबल बुक होते ज्यावरून वाद झाला होता. राजने सांगितले की, त्याने एक वर्षापूर्वी टेबल बुक केले होते आणि त्याच्याबरोबर २० हून अधिक कुटुंबातील सदस्य होते, ज्यांना निघून जाण्यास सांगण्यात आले होते.

राज कुंद्राने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले की, ‘ऑनलाइन व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. मी माझ्या पत्नीच्या वाढदिवसासाठी त्या रेस्टॉरंटमध्ये एक वर्षापूर्वी एक टेबल बुक केले होते. दुर्दैवाने, जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आमचे टेबल दुसऱ्या ग्रुपला देण्यात आले आहे. त्यांनी याला ‘डबल बुकिंग एरर’ म्हटले.’ राज कुंद्रा म्हणाला की ही घटना खूप निराशाजनक होती. जेव्हा त्यांनी या चुकीबद्दल नाराजी व्यक्त केली, तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबासह तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले.

राज म्हणाला, ‘तो देखील एक रेस्टॉरंट चालवतो, मला ही परिस्थिती खूप निराशाजनक वाटली, विशेषतः जेव्हा माझे वृद्ध आई-वडील, सासू आणि २० पाहुणे वाट पाहत होते. मी एक खास संध्याकाळ बनवत होतो, जी तणावात बदलली. जेव्हा मी आवाज उठवला तेव्हा आम्हाला गप्प राहण्यास सांगण्यात आले.’

काय होतं प्रकरण?

राज त्याची पत्नी शिल्पा शेट्टीचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी क्रोएशियाला गेला होता. तिथून एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्याबरोबर कॅप्शन असे होते की शिल्पा शेट्टी आणि तिचे कुटुंब एका परदेशी मुलीशी वाद घालत होते, कारण तिने त्यांना शांतपणे बोलण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राज कुंद्रा तिथे रागाने म्हणाला, तुम्हाला माहीत नाही आम्ही कोण आहोत. राज कुंद्रा लवकरच करण जोहरच्या ‘ट्रेटर’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.