बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर आता राज कुंद्राने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणी तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही. काही दिवसांपूर्वी शिल्पा शेट्टी ही मुलांसह अलिबागला रवाना होताना दिसली. पण तिच्यासोबत तिचा पती राज कुंद्रा उपस्थित नव्हता. या प्रकरणानंतर राज कुंद्रा हा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर त्याने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Rameshwaram Cafe Bomb Blast Case
रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सूत्रधारासह एकाला अटक; एनआयएची मोठी कारवाई
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…
Calcutta High Court
संदेशखालीतील प्रकरण अत्यंत लाजिरवाणे; कलकत्ता उच्च न्यायालयाचे ताशेरे

राज कुंद्राने त्याचे इन्स्टाग्राम आणि ट्वीटर अकाऊंट डिलीट केले आहे. शिल्पा शेट्टीप्रमाणे राज कुंद्राही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहतो. मात्र पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी त्याला फार ट्रोल केले होते. त्यामुळेच त्याने सोशल मीडिया अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला असावा, असं बोललं जात आहे.

दोन महिन्यांनी जामिनावर सुटका

दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला १९ जुलै महिन्यात अटक केली होती. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अ‍ॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी २० सप्टेंबरला पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला दिलासा मिळाला होता. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५० हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला होता. त्यासोबत राज कुंद्राचा साथीदार आणि या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार असलेल्या रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे.