बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात फसल्यानं तुरुंगात जाऊन आल्यावर आता काही वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसतो. मात्र नुकतंच मुंबई एअरपोर्टवरील त्याचा लुक पाहिल्यानंतर मात्र त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जात आहे. राज कुंद्रा जेव्हा एअरपोर्टवर स्पॉट झाला त्यावेळी त्यानं आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेतला होता. त्याचा हा विचित्र लुक पाहून नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केलं आहे.
काही दिवसांपूर्वी देखील राज कुंद्रा अशाच अवतारात एअरपोर्टवर स्पॉट झाला होता आणि त्याचा हा लुक पाहिल्यावर शिल्पा शेट्टीला देखील हसू आवरणं कठीण झालं होतं. आताही राज कुंद्राला या लुकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे. या व्हिडीओमध्ये त्यानं निळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे आणि एक मास्क लावलेला दिसत आहे ज्यामुळे त्याचा पूर्ण चेहराच झाकला गेला आहे.
आणखी वाचा- प्रियांका चोप्रा आणि निक जोनसच्या मुलीच्या नावाचा झाला खुलासा, फारच खास आहे अर्थ
राज कुंद्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून या व्हिडीओमुळे त्याला बरंच ट्रोल केलं जात आहे. अनेक लोकांनी त्याला ‘मधमाशी’ म्हटलं आहे. राज कुंद्राच्या या व्हिडीओवर युजर्सच्या कमेंट्स पाऊस पडलेला आहे. अनेकांनी यावर मजेदार कमेंट केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, ‘आज तर हा जादू बनून आला आहे.’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘आता हा कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलेला नाही.’
दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणात नाव आल्यानंतर मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली. त्याच्यावर अश्लील फिल्म तयार केल्याचा आरोप होता आणि त्यासाठी त्याला तब्बल दोन महिने तुरुंगात जावं लागलं होतं. सध्या त्याला जामिनावर बाहेर सोडण्यात आलं आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रानं सोशल मीडियापासून दूर राहाणं पसंत केलं आहे. त्याने सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलिट केली आहेत.