scorecardresearch

पॉर्नोग्राफी केसप्रकरणी तुरुंगातून सुटल्याची वर्षपूर्ती; राज कुंद्रा ट्वीट करत म्हणाला, “ही फक्त…”

तुरुंगातून सुटल्यापासून राज कुंद्रा त्याच्या मास्कमुळे चर्चेत असतो.

पॉर्नोग्राफी केसप्रकरणी तुरुंगातून सुटल्याची वर्षपूर्ती; राज कुंद्रा ट्वीट करत म्हणाला, “ही फक्त…”
या ट्वीटबरोबरच राजने त्याचा एक फोटोही शेअर केला आहे.

चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा मागच्या वर्षी पॉर्न व्हिडीओ प्रकरणामुळे वादात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर त्याला अटक देखील झाली होती, काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. राज याच्या सुटकेला आज २१ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालंय. यानिमित्ताने त्याने एक ट्वीट करत पॉर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य केलंय.

“ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका होऊन आज एक वर्ष झालं. ही फक्त काळाची गोष्ट आहे, न्याय नक्कीच मिळेल! सत्य लवकरच बाहेर येईल! हितचिंतकांचे आभार आणि ट्रोल करणाऱ्यांचे खूप खूप आभार, तुम्ही मला खूप मजबूत बनवता” असं राजने ट्वीटमध्ये म्हटलंय. याबरोबरच राजने त्याचा मास्क घातलेला एक फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, तुरुंगातून सुटल्यापासून राज कुंद्रा त्याच्या मास्कमुळे चर्चेत असतो. तो मीडियासमोर विविध प्रकारचे मास्क घालून येतो.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं राज कुंद्राला अश्लील चित्रफीत बनवणे आणि त्याचं वितरण करणे या गुन्ह्याखाली अटक केली होती. काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्राला जामीन मंजूर झाला होता. त्यावेळी त्याने प्रतिक्रिया देत प्रसार माध्यमांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असल्याचा दावा केला होता. याबद्दल एक निवेदन ते त्याने त्याच्यावरील आरोप देखील फेटाळून लावले आहेत. “प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असून मी अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्यात अजिबात सहभागी नव्हतो. हा सगळा प्रकार म्हणजे मला जाणून बुजून टार्गेट करण्याचा होता”, असं राज कुंद्रा म्हणाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या