गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे चर्चेत आहे. दरम्यान शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये एका जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुनंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीचा राज कुंद्रा प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.

सुनंदा यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान एका व्यक्तीसोबत कर्जत येथे जमीन खरेदीचा व्यवहार झाला होता. त्यावेळी त्या व्यक्तीने ती जमीन त्याच्या नावावर असल्याचे सांगत खोटे कागदपत्र दाखवून सुनंदा यांना ती जमीन १ कोटी ६० लाख रुपयांना विकली होती.

काही दिवसांनंतर सुनंदा यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी त्या व्यक्तीला याबाबत विचारले. त्यावेळी त्या व्यक्तीने एका राजकीय पक्षाचे नेते त्यांच्या जवळचे असल्याचे सांगितले आणि सुनंदा यांना कोर्टात जाण्यास सांगितले. त्यानंतर सुनंदा यांनी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी कर्जमतमधील एका जमीन व्यवहारात खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करुन जमीन विकल्याचा आरोप केला आहे.