बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या संपूर्ण प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. नुकतंच राज कुंद्राने पापाराझींपासून वाचण्यासाठी हटके मास्क परिधान केला होता. मास्कसह त्याने चेहऱ्याला काळ्या रंगाची शिल्ड लावून चेहरा पूर्णपणे लपवण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर नुकतंच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राज हा त्याची आई उषा राणी कुंद्रा, सासू सुनंदा शेट्टी आणि शिल्पाची बहिण शमिता शेट्टीसोबत गाडीतून उतरत असल्याचे दिसत आहे. यावेळी गाडीतून उतरुन ते चौघेजण लिफ्टच्या दिशेने जातात.

“आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसात…”, अभिज्ञा भावेने शेअर केला कर्करोगाशी झुंज देणाऱ्या पतीसोबतचा खास व्हिडीओ

यावेळी राजने फोटोग्राफर्सपासून वाचण्यासाठी फूल मास्क आणि एका काळ्या रंगाच्या शिल्डचा वापर केला होता. यामुळे यातून त्याचा चेहराच दिसत नव्हता. राज कुंद्रा लिफ्टजवळ पोहोचताच त्याची शिल्पा शेट्टीशी भेट झाली. राजला अशाप्रकारच्या मास्कमध्ये पाहून शिल्पा शेट्टी जोरजोरात हसून प्रतिक्रिया दिली. तिचा हा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

KBC 14 Registrations : ‘केबीसी’च्या १४ व्या पर्वासाठी नोंदणी सुरु, ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हीही होऊ शकता सहभागी

राज कुंद्राचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी राज कुंद्राची तुलना अभिनेता रणवीर सिंहसोबत केली आहे. तर अनेकांनी त्याला टोमणेही मारले आहेत. तू असे काम करतोसच कशाला की तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक नसेल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. ‘आधी तोंड काळं करुन आता तोंड लपवत फिरतोस’, असे एकाने म्हटले आहे. दरम्यान त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत होता. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयीन कोठडीत वाढ होत गेली. राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले होते. आता त्याला जामीन मंजूर झाला आहे.