हिमाचलमधून परतताना शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ व्हायरल, ‘या’ कारणामुळे पापाराझींवर वैतागली

शिल्पाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या चर्चा राज कुंद्राला पार्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. त्यानंतर शिल्पा आणि राज यांच्या नात्यामध्ये फूट पडली असल्याचे देखील म्हटले जात होते. आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे एकत्र आले असून हिमाचलमध्ये देवीचे दर्शन घेताना दिसले होते. त्यानंतर आता शिल्पा मुंबईत परतली आहे. नुकतंच ती विमानतळावरुन बाहेर पडतानाचा एका व्हिडीओ समोर आला आहे.

शिल्पा शेट्टीचा विमानतळावरुन बाहेर पडतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती एकटी दिसत आहे. तिच्यासोबत राज कुंद्रा किंवा तिचा मुलगा वियान आणि मुलगी समीक्षा दिसत नाही. विमानतळावरुन बाहेर पडत असताना काही पापाराझी तिचे फोटो काढताना दिसत आहे. यावेळी काही पापराझी तिला फोटो काढण्यासाठी सक्ती करताना दिसत आहेत. त्यावर शिल्पा वैतागते आणि ‘ले ले भाई’, असे म्हणते. त्यानंतर ती उभी राहून फोटो काढते आणि धन्यवाद बोलून निघून जाते.

तिचा हा व्हिडीओ इन्संट बॉलिवूड नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवरुन अपलोड करण्यात आला आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी कमेंट करत ‘राज कुंद्रा कुठे आहे’? असा प्रश्न विचारला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर राजला जामीनही मंजूर झाला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राज कुंद्राने त्याचे सर्व सोशल मीडियावरुन अकाऊंट डिलीट करत एक्झिट घेतली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty returns from himachal pradesh mumbai airport video viral nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या