‘राजच्या अॅपवर पॉर्न नाही इरॉटिक चित्रपट आहेत आणि…’; शिल्पा शेट्टीचा खुलासा

शुक्रवारी शिल्पा आणि राज कुंद्राच्या जुहूतील घरी पॉर्नोग्राफीच्या प्रकरणी शिल्पाची ६ तास चौकशी करण्यात आली.

shilpa shetty, Raj Kundra
पॉनोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीची चौकशी…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्न चित्रपटांची निर्मिती आणि पॉर्न अ‍ॅपप्रकरणी १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली. काल न्यायालनाने राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी शिल्पाची ६ तास चौकशी केली. ही चौकशी जुहूच्या त्यांच्या घरी झाली. त्यानंतर पॉर्नाग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचे विधान नोंदवण्यात आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या चौकशीत शिल्पाने स्वत: ला या प्रकरणातून दूर केले आहे आणि अश्लील चित्रपट बनविण्यात तिची काही भूमिका नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान शिल्पा म्हणाली की, “तिचा पती राज कुंद्राच्या हॉटशॉट या अॅपवर येणारे चित्रपट हे अश्लील चित्रपट नसून इरोटिक चित्रपट आहेत. यापेक्षा जास्त अश्लील चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायाला मिळतात,” असे शिल्पा म्हणाल्याचे त्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

आणखी वाचा : पतीच्या अटकेनंतर शिल्पाची भावनिक पोस्ट, केली ‘ही’ विनंती

शिल्पाची चौकशी करण्यासोबतच मुंबई गुन्हे शाखेने त्यांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जप्त केले आहेत. सध्या या सगळ्या प्रकरणात शिल्पाचा सहभाग आहे का याचा तपास सुरु आहे. शिल्पाची चौकशी सुरु असण्याचे कारण म्हणजे तिने राज कुंद्राची वियान इंडस्ट्री या कंपनीत असलेल्या डायरेक्टरच्या पदावरून राजीनामा दिला होता. यावरून शिल्पानेही अश्लील चित्रपटांद्वारे पैसे कमावले आहेत की नाही याचा शोध पोलिस घेते आहेत.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

आणखी वाचा : ‘तिला हाडांच्या डॉक्टरांची गरज आहे..’, बॉडी पॉश्चरमुळे नोरा झाली ट्रोल

मुंबई गुन्हे पोलिस आता शिल्पाच्या बॅंक अकाऊंटचीही तपासनी करणार असून ती किती वेळ राजच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम करत होती याची तपासनी करणार आहे. तर दुसरीकडे राजने त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. तर न्यायालयाने राज कुंद्राला २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty says the content on her husband raj kundra s app is not porn it is erotica dcp