scorecardresearch

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने करवा चौथ निमित्ताने केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

शिल्पा शेट्टीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

राज कुंद्रा पॉर्न प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीने करवा चौथ निमित्ताने केलेली पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय
शिल्पा शेट्टीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आज करवा चौथ निमित्ताने शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाने करवा चौथ निमित्ताने मिळालेली सरगी दाखवली आहे. सोबतच सगळ्यांना करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.राज कुंद्रा पॉर्न प्रकरणानंतर आता शिल्पाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

काही दिवसांपूर्वी शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिल्पाने तिच्या हेअर कट केल्याचे दिसत आहे. केस बांधत असतानाच शिल्पाचा नवा हेअर कट दिसून येतोय. हा हेअर कट ‘अंडरकट बझ कट’ आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 15:34 IST

संबंधित बातम्या