अर्धे केस का काढले?; शिल्पा शेट्टीच्या ‘त्या’ हेअरकट मागचं खरं कारण आलं समोर

शिल्पाचा डोक्यावरील अर्धे केस काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

shilpa shetty, shilpa shetty haircut, shilpa shetty reson behind new haircut,
शिल्पाचा अर्धे केस काढतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. शिल्पाचा पतीला राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. त्यामुळे शिल्पा काही दिवस सर्वांपासून लांब होती. त्यानंतर ती पुन्हा रिअॅलिटी शोमध्ये दिसू लागली. पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा वैष्णोदेवी दर्शनाला गेली होती. आता शिल्पाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये शिल्पाने डोक्यावरचे अर्धे केस काढले आहेत. शिल्पाने असे का केले? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या मागचे कारण समोर आले आहे.

पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पाने वैष्णोदेवीला जाऊन नवस केला होता की जर पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला तर डोक्यावरचे अर्धे केस काढेन. त्यामुळे पतीला जामीन मिळाल्यानंतर शिल्पाने डोक्यावरचे अर्धे केस काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘अंडरकट बझ कट’ केल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा : ‘तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही…’, शर्लिन चोप्रा शिल्पा आणि राज कुंद्रावर संतापली

शिल्पाने शेअर केलेला व्हिडीओ जिममधील आहे. या व्हिडीओत आधी ती पाठमोरी उभी असल्याचं दिसतंय. शिल्पा केस बांधत आहे. त्यानंतर ती वर्कआऊट करू लागते. मात्र केस बांधत असतानाच शिल्पाने नवा हेअरकट केल्याचे म्हटले जात होते. पण डोक्यावरील अर्धे केस काढण्यामागचे कारण आता समोर आले आहे.

काही नेटकऱ्यांनी शिल्पाचा हा व्हिडीओ पाहून तिचं कौतुक केले होते तर काहींनी मात्र कमेंट करत तिची थट्टा केली होती. एका यूजरने, “अर्धी टकली झाली” असे म्हटले होत. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “तिरुपतिला जावून केस काढले वाटतं आणि वरुन वीग घातलं आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty shave her undercut as a mannat for husband raj kundra avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या