‘तिने माझ्या पोटावर लाथ मारली’, फराह खानचा शिल्पा शेट्टीवर आरोप

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेत असते. ती सतत तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच शिल्पाने शेअर केलेला व्हिडीओ देखील चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा आणि फराह खान भांडताना दिसत आहेत.

शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला शिल्पा गुलाबी रंगाची साडी नेसून एका जाहिरातीच्या चित्रीकरणाची वाट पाहताना दिसत आहे. दरम्यान फराह खान तेथे पोहोचते आणि ही जाहिरात पाहिले मी करणार होते. शिल्पाने माझ्या पोटावर पाय दिला आहे असा आरोप करते. त्यावर शिल्पा शेट्टी म्हणते, ‘हा पोटाचा प्रश्न आहे. ही जाहिरात मला माझ्या पोटामुळेच मिळाली आहे. आता ही जाहिरात आम्ही दोघी मिळून करत आहोत.’

पाहा फोटो : २५० कोटींची मालकीण माधुरी दीक्षित राहते मुंबईतील आलिशान बंगल्यात

पाहा फोटो : ‘हे’ मराठमोळं कपल मालदीवमध्ये एन्जॉय करतय हनीमून

शिल्पा आणि फराह खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १६ लाखा पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. लवकरच शिल्पा शेट्टी ‘निकम्मा’ आणि ‘हंगामा २’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटांच्या माध्यामातून जवळपास १३ वर्षांनंतर शिल्पा पुन्हा चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shilpa shetty steals farah khan ad choreographer fight with her video goes viral avb