बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. शिल्पाचा पती बिझनेसमन राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतर शिल्पा शेट्टीसंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. दरम्यान काही काळ शिल्पा शेट्टी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहात नव्हती. मात्र जवळ-जवळ एक महिन्यानी ती ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ च्या सेटवर परत आली. आता ती अजून एका रिअॅलिटी शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिल्पा लवकरच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या नवीन सिझन मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या शोचा प्रोमो तिने अधिकृत इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत, “एक देश अनेक टॅलेंट! भारतामध्ये खूप टॅलेंट आहे आणि आता ते जागासमोर येणार आहे आहे, लवकरच या शोसाठी ऑडिशन सुरू होतील. मला पण खूप उत्सुकता आहे”, असे कॅप्शन दिले आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शो मध्ये देशभरातील अनेक लोक येऊन त्यांच्यात असलेले कलागुण प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसतील. शिल्पाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

ipl 2024 gujarat titans beautiful mystery girl compared with hollywood actress ana de armas shubman gill reaction viral
VIDEO : पृथ्वी शॉच्या गर्लफ्रेंडवर शुबमन गिलचा डोळा? नेटिझन्स म्हणाले, “ओहह भावा…”
jaguar land rover
लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये प्रेक्षकांनी किरण खेर, मलायका अरोरा, सोनाली बेंद्रे, करण जोहर, शेखर कपूर आणि धर्मेंद्र यांना आतापर्यंत जज म्हणून पाहिले आहे. आता, शिल्पा शेट्टी सोनी टीव्हीसह या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. या आधी तिने अनेक डान्स रिअॅलिटी शो मध्ये जज म्हणून काम केले आहेत, त्यामुळे या शो मध्ये तिला जज म्हणून पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या शो बद्दल बोलताना तिने सांगितलं, “इंडियाज गॉट टॅलेंट हा शो मी नियमितपणे पाहते. भारत हा वेगवेगळ्या टॅलेंटने संपन्न असा देश असून या शोच्या जज पॅनल मध्ये सामील होताना मला खूप आनंद झाला आहे. मी प्रथमच अशा विविध प्रकारच्या कला-कौशल्यांवर आधारित असलेल्या रिअॅलिटी शोची जज म्हणून काम करणार आहे.”