बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. राज कुंद्राची नुकतीच जामीनावर सुटका झाली आहे. मात्र या प्रकरणामुळे शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा चांगलेच चर्चेत आले होते. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पाने ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोचं शूटिंगदेखील काही दिवस बंद केलं होतं. जवळपास एक महिन्यांनी ती याशोच्या शूटिंगसाठी पुन्हा परतली होती.

यानंतर आता शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये जजच्या भूमिकेत झळकणार आहे. शिल्पाने या शोचा प्रोमो नुकताच शेअर केला. मात्र यामुळे ती चांगलीच ट्रोल झालीय. नेटकऱ्यांनी कमेंट करत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर निशाणा साधला आहे.

शिल्पा शेट्टीच्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय. तर अनेक नेटकऱ्यांनी शिल्पाला चांगलचं ट्रोल केलं आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, “राज कुंद्राकडे एक से बढकर एक खूप टॅलेंट आहे. मॅम त्यांनाही बोलवा टीव्हीवर आम्हालादेखील पाहू द्या”, तर दुसरा युजर म्हणाला, “तुमच्या पतीचं टॅलेंट दाखवा.” आणखी एक युजर म्हणाला, “कुंद्रादेखील आपलं टॅलेंट दाखवू शकतो.”

शिल्पाच्या एका वक्तव्यावर निशाणा साधत एक युजर म्हणाला, “बेस्ट टॅलेंट-पत्नीला पती काय करतोय हेच ठाऊक नाही किंवा जाणून घेण्याची इच्छा नाही”. अनेक नेटकऱ्यांनी राज कुंद्रावरून शिल्पावर निशाणा साधला आहे.

‘या’ ऑलिम्पिक खेळाडूसोबत दीपिका पदूकोण बॅडमिंटन कोर्टमध्ये गाळतेय घाम; रणवीर सिंहने केली ‘ही’ कमेंट

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये प्रेक्षकांनी किरण खेर, मलायका अरोरा, सोनाली बेंद्रे, करण जोहर, शेखर कपूर आणि धर्मेंद्र यांना आतापर्यंत जज म्हणून पाहिले आहे. आता, शिल्पा शेट्टी या शो मध्ये जजच्या भूमिकेत दिसणार आहे. या आधी तिने अनेक डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची भूमिका पार पडली आहे.