Video: “ब्लाउजच घातलं नाही तर मास्क कुठून आणणार”; ‘त्या’ ड्रेसमुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून शिल्पाला तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

shilpa-shetty-troll
(Photo-instagram@theshilpashetty)

बॉलिवूडची यमी मम्मी शिल्पा शेट्टी ‘हंगामा-२’ या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झालीय. नुकत्याच या सिनेमाच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये शिल्पा शेट्टी सहभागी झाली होती. या इव्हेंटमधील शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून शिल्पा शेट्टीला तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. अनेक नेटकऱ्यांनी शिल्पा शेट्टीवर अंगप्रदर्शनावरून निशाणा साधला आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भैयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या इव्हेंटमधील एक व्हिडीओ शेअर केलाय. यात शिल्पाने मरुण रंगाचं ब्रालेट आणि लेदर स्कर्ट परिधान केल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. मात्र शिल्पाचा ड्रेस पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हे देखील वाचा: ‘हे’ आहे सैफ अली खान आणि करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव; चिमुकल्याला सैफ लाडाने म्हणतो…

एक युजर म्हणाला “बॉलिवूडची किम कार्दशियन” दुसरा युजर म्हणाला, “मास्क कुठे आहे.” यावर एक युजर म्हणाला, “ब्लाउजच नाही घातलं तर मास्क कुठून घालणार” आणखी एक युजर म्हणाला, “ब्लाउज घालायला विसरली” अनेक नेटकऱ्यांनी शिल्पाच्या या लूकवरून तिला ट्रोल केलंय.

shilpa-shetty-troll
(Photo-Instagaram@manav manglani)

हे देखील वाचा: “निर्लज्जपणाची हद्द झाली”; वयोवृद्ध गार्डने गाडीचं दार उघडल्याने कियारा आडवाणी ट्रोल

तर शिल्पाच्या काही चाहत्यांनी मात्र पुन्हा एकदा तिच्या फिटनेसचं कौतुक केलंय.

दरम्यान, ‘हंगामा २’ हा सिनेमा २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हंगामा या सिनेमाचा सीक्वल आहे. येत्या २३ जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मिजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतच या सिनेमातील ‘चुरा के दिल मेरा 2.0’ गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. या गाण्यावर शिल्पा आणि मिजान यांचा डान्स पाहण्यासारखा आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shilpa shetty trolled for her latest outfit in hangama 2 film promotion event video goes viral kpw

ताज्या बातम्या