scorecardresearch

‘शिवाय’ सिनेमाचा पहिला दमदार डायलॉग प्रोमो प्रदर्शित

अजयच्या व्यक्तिरेखेचे वेगळेच पैलू दिसन येतात

‘शिवाय’ सिनेमाचा पहिला दमदार डायलॉग प्रोमो प्रदर्शित
या सिनेमात एक नव्हे तर अनेक 'सरप्राईज' पाहायला मिळणार आहेत

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी ‘शिवाय’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीच गोष्ट कमी पडू नये याची खबदरादी तो घेत आहे. अजयचा हा पहिला सिनेमा आहे ज्यात अजयने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशी तिहेरी भूमिका बजावली आहे. आतापर्यंत सिनेमाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या टिझर, ट्रेलरमध्ये अजय एक विध्वंसक वाटत असतो. पण या सिनेमाचा जो डायलॉग प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे ज्यात अजयच्या व्यक्तिरेखेचे वेगळेच पैलू दिसन येतात.

सिनेमाचा २९ सेकंदाच्या या प्रोमोमध्ये अजय एका लहान मुलीशी भावनिक संवाद बोलताना दिसत आहे. आतापर्यंत जे प्रोमो आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले त्यात संगीत आणि अतिरिक्त इफेक्ट्सच देण्यात आले होते. या प्रोमोमध्ये अजय आपल्या मुलीकडे हे कबूल करतो की त्याने तिच्या आईबद्दल खोटे सांगितले. हा संपूर्ण सीन फार भावनिकरित्या चित्रित करण्यात आला आहे. पण या प्रोमोमुळे सिनेमाची मूळ कथा मात्र तितकीशी समजत नाही. त्यासाठी सिनेमा बघितल्याशिवाय पर्याय नाही.

या प्रोमोच्या पुढच्या दृश्यामध्ये अजय त्याच्या मुलीला आईला भेटवायला घेऊन जातो. जेव्हा अजय त्याच्या मुलीला विचारतो की तू आईला भेटल्यावर काय विचारणार तेव्हा ती मुलगी एक चित्र त्याला दाखवते ज्यात का? का? का? असा प्रश्न लिहिलेला असतो. तर दुसऱ्या दृश्यात खलनायक हेलिकॉप्टरमधून अजय आणि त्याच्या मुलीवर गोळीबार करताना दिसत आहे. यात अजय मुलीला वाचवण्याचा आटोकात प्रयत्न करताना दिसत आहे. इंग्रजी संकेतस्थळ बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमात एकूण एक किंवा दोन नाही तर तब्बल पाच खलनायक असणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-10-2016 at 15:14 IST

संबंधित बातम्या