शिवानी सुर्वे लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

शिवानीला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलीटी शो बिग बॉस मराठी सिझन २मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. आता शिवानी एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ती निर्माता दिपक राणे यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात शिवानीसोबत अजून कोणकोणते कलाकार असतील ही माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.

गेल्या दहा वर्षातल्या यशस्वी टिव्ही कारकिर्दीनंतर ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो तिने केला. २०१६मध्ये शिवानी ‘घंटा’ सिनेमात झळकली. त्यानंतर २०१९ मध्ये अभिनेता अंकुश चौधरीसोबतच्या ‘ट्रिपल सीट’ सिनेमात ती दिसली. शिवाय २०२० मध्ये सिटी सिने अवॉडर्समध्ये शिवानीला ‘ट्रिपल सीट’ सिनेमासाठी ‘सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच तिचा चाहता वर्ग ही अफाट आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वे तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी बोलताना म्हणाली, “मी या सिनेमासाठी फारच उत्सुक आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ही कथा ऐकली. त्यानंतर मी क्षणाचाही विलंब न करता त्वरीत होकार कळवला. खरंतर या सिनेमातील माझी भूमिका खूपच चॅलेंजींग आहे. आणि मी पहिल्यांदाच माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी चॅलेंजींग करणार आहे. सध्या मी सिनेमातील भूमिकेची तयारी करत आहे. तर या सिनेमाच शुटींग लवकरच सुरू होईल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivani survey upcoming movie avb

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी