मिका सिंग आणि वाद हे समीकरण जणू ठरलेलंच आहे. गायक मिका सिंग पुन्हा एकदा नव्या वादात अडकताना दिसतोय. या वादाचं कारण म्हणजे पाकिस्तानचा निर्मिती दिन. पाकिस्तानच्या निर्मिती दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी होण्यासाठी आणि कार्यक्रमात गाणं सादर करण्यासाठी मिका सिंग तयारी करतोय. १२ ऑगस्ट रोजी अमेरिकेत ‘जश्न ए आझादी’ कार्यक्रमात मिका सिंग गाणं सादर करणार आहे. मात्र काही राजकीय पक्षांनी याचा विरोध केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिकाने पाकिस्तानच्या निर्मिती दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये, असा सल्ला शिवसेनेनं दिलाय. इतकंच नव्हे तर त्याने देशवासियांची आणि मुंबईतल्या लोकांची माफी मागावी असे शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मिकाने माफी न मागितल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर मिळेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

VIDEO : नितारासोबतचं ‘डे आऊट’ अक्षयला पडलं महागात

पाकिस्तानच्या निर्मिती दिनाच्या निमित्ताने अमेरिकेतील शिकागोमध्ये एक कार्यक्रम आयोजिक केला गेलाय. याच कार्यक्रमात मिका सिंग पाकिस्तानी गायकांसोबत स्टेज शेअर करणार आहे. यासंदर्भात मिकाचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये मिका पाकिस्तानी गायक रेहानसोबत शिकागोमधील कार्यक्रमाबद्दल माहिती देताना दिसतोय. त्याचप्रमाणे व्हिडिओमध्ये मिकाने आपला पाकिस्तान असा उल्लेख केलाय. त्यामुळे काही राजकीय पक्षांचा पारा चढलाय. एकीकडे शिवसेना त्याला माफी मागायला सांगितले असून दुसरीकडे भाजपने मिकाला थेट पाकिस्तानला जाण्यास सांगितले. यावर आता मिका सिंगची काय प्रतिक्रिया देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena and bjp opposing mika singh for joining pakistan independence function in america
First published on: 26-07-2017 at 10:46 IST