मुंबई पोलिसांची खिल्ली उडविल्याने शोभा डे पुन्हा वादात

‘हेवी पोलीस बंदोबस्त इन मुंबई टुडे’

Shobha De , BMC Election 2017, Mumbai police, controversy , Loksatta, body shame, cops, Loksatta news, Marathi, Marathi news
Shobha De : मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे वाढलेले वजन आणि फिटनेसवर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, शोभा डे यांनी ट्विट केल्यानंतर या प्रकरणाला भलतेच वळण लागले.

वादग्रस्त आणि फटकळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लेखिका शोभा डे या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. शोभा डे यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचे छायाचित्र ट्विट केले आहे. मात्र, या छायाचित्राबरोबरचा संदेश संबंधित कर्मचाऱ्यावर शारीरिक टिप्पणी करणारा आहे. शोभा डे यांनी ट्विट केलेल्या छायाचित्रात एक वजनदार पोलीस कर्मचारी दिसत असून शोभा डे यांनी त्याला उद्देशून ‘हेवी पोलीस बंदोबस्त इन मुंबई टुडे’, असा काहीसा खिल्ली उडवणारा संदेश लिहला आहे. मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे वाढलेले वजन आणि फिटनेसवर यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. मात्र, शोभा डे यांनी ट्विट केल्यानंतर याप्रकरणाला भलतेच वळण लागले. पोलीस कर्मचाऱ्याची शारीरिक खिल्ली उडविल्याने अनेक ट्विटरकरांकडून शोभा डे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shobha de make fun of mumbai police create new controversy