scorecardresearch

Video: एकता कपूरला गुंडांनी बंदूकीचा धाक दाखवला अन्…

हे गुंड एकता कपूरला कुठे घेऊन गेले? त्यांनी असे का केले? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

Video: एकता कपूरला गुंडांनी बंदूकीचा धाक दाखवला अन्…

सध्या सोशल मीडियावर टीव्ही क्वीन एकता कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही गुंडे तिचे अपहरण करताना दिसत आहेत. सध्या एकताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण हे गुंडे कोण आहेत? एकता कपूरचे अपहरण का केले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकताचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स एकताच्या ऑफिस बाहेर तिचे फोटो काढण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात काही गुंडे तेथे येतात. बंदूकीचा धाक दाखवून तिला जबरदस्ती गाडीमध्ये बसालया लावतात. एकता कपूर प्रचंड घाबरते. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Video: राखी सावंतचा ‘पुष्पा’मधील ‘सामी सामी’ गाण्यावर भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना चिंता वाटत आहे. एकताचे खरच अपहरण झाले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण हा व्हिडीओ खरा नसून एकताने केलेला प्रँक आहे. हे एकताची आगामी सीरिज ‘अपहरण २’चे प्रमोशन असल्याचे म्हटले जात आहे. ‘अपहरण २’ ही सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या