‘Oh My God 2’ चं शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी रद्द

‘या’ चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते.

OMG
(Photo-Loksatta Filed Images)

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली होती. अशात आता पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतमची प्रमुख भूमिका असलेला ‘ओएमजी: ओ माय गॉड २’ चे शूटिंग सुरू झाले होते. मात्र आता या चित्रपटच्या क्रू मधील ७ सदस्यांची कोविड -१९ चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे .

‘मिड-डे’ ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू होते आणि गेल्या पाच दिवसात ७ लोकांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे चित्रपटाचा निर्माता आश्विन वर्दे याने चित्रपटाचे शूटिंग पुढील दोन आठवड्यांसाठी थांबवले आहे. कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या सदस्यांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि दिग्दर्शक अमित राय यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान, ‘ओ माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भागा परेश रावल यांच्यामुळे सुपरहिट ठरला होता. मात्र या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये परेश रावल यांच्याऐवजी पंकज त्रिपाठींना घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेसृष्टीतील सूत्रांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटाच्या सिक्वेलमधील मुख्य भूमिकेसाठी परेश रावलच त्यांची पहिली पसंती होती. याबाबत निर्मात्यांनी त्यांच्याशी बातचीतदेखील सुरु केली होती. मात्र परेश रावल यांनी या भूमिकेसाठी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची मागणी केल्याने निर्मात्यांनी त्यांना नकार दिला

अश्विनने या आधी ‘कबीर सिंग’, ‘नोटबुक’ सारख्या लोकप्रिय चित्रपटांची निर्माती केली आहे. ‘ओ माय गॉड २’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘देवा’च्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shoot of pankaj tripathi and yami gautam omg oh my god 2 halted aad

ताज्या बातम्या