scorecardresearch

‘नॉन व्हेज सोडल्यानंतर श्रद्धा झाली जास्त फीट आणि…’, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

हा व्हिडीओ शेअर करत ती गेल्या दोन वर्षांपासून शाकाहारी असल्याचं तिने सांगितलं आहे.

‘नॉन व्हेज सोडल्यानंतर श्रद्धा झाली जास्त फीट आणि…’, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
हा व्हिडीओ शेअर करत ती गेल्या दोन वर्षांपासून शाकाहारी असल्याचं तिने सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धा ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता श्रद्धाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ती २ वर्षांपासून शाकाहारी झाली तर त्याचा तिचा अनुभव कसा होता हे सांगितलं आहे.

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत श्रद्धाने ती काय खाते ते सांगितले आहे. त्या सगळ्यामुळे ती कशी फीट झाली आणि आनंदात राहते हे तिने सांगितले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मासं, मच्छी आणि मटनचे सेवन केले नाही असे तिने सांगतिले आहे. आपल्या जेवनासाठी कोणचा जिव घेऊ नका. या कारणामुळे ती शाकाहारी झाली आहे.

आणखी वाचा : मनसैनिकांकडून मार खाणारे शिवसेनेचे पदाधिकारी? आदेश बांदेकरांनी दिलं स्पष्टीकरण

हा व्हिडीओ शेअर करत “आपण सर्वजण जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करत असताना, मला हे सांगायचं होतं की मी २१ जुलै २०२१ रोजी शाकाहारी होण्यास दोन वर्ष पूर्ण केली. मी प्राण्यांवर असलेले माझे प्रेम पाहता शाकाहारी होण्याचे ठरवले. यामुळे मी फीट आणि आनंदी झाले,” अशा आशयाचे कॅप्शन श्रद्धाने दिले आहे.

आणखी वाचा : ‘राज कुंद्रा मला किस करत म्हणाला, माझे शिल्पासोबतचे संबंध ठीक नाहीत आणि…’, शर्लिन चोप्राचा धक्कादायक दावा

श्रद्धाचे लाखो चाहते आहेत. श्रद्धा कपूर टायगर श्रॉफसोबत ‘बाघी ३’ या चित्रपटात दिसली होती. लवकरच तिचे ‘नागिन’ आणि ‘स्त्री २’ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर ‘स्त्री’मध्ये श्रद्धा राजकूमार रावसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या