बॉलिवूडमधील नवीकोरी जोडी श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ कपूर ‘एक व्हिलन’ या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या चित्रपटासाठी ते कमालीची मेहनत घेत आहेत. चित्रपटातील ‘गलियाँ’ या पहिल्या गाण्यासाठी श्रद्धा आणि सिद्धार्थने पाण्याखाली सात तास एकत्रितपणे घालवले केले. या आधी ‘हंसी तो फसी’ चित्रपटात परिणिती चोप्राबरोबर दिसलेल्या सिद्धार्थने या गाण्याच्या वेळी पाण्याखाली मासे आणि श्रद्धाबरोबर वेळ घालवला. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने या गाण्याच्या पाण्याखालील दृष्याची काही छायाचित्रे टि्वट केली आहेत.

उत्कृष्ट जलतरणपटू असलेल्या श्रद्धा कपूरने पाण्याखालील चित्रीकरणाआधी सिद्धार्थबरोबर अनेकवेळा याबाबतचे धडे गिरवले. ‘एक व्हिलन’ चित्रपटात गाणे गाण्याबरोबरच पाण्याखाली गाण्याचे चित्रीकरण करण्याचा श्रद्धासाठी हा दुसरा नवा अनुभव होता. अनिकेत तिवारी यांनी लिहिलेल्या ‘गलियाँ’ या गाण्याला श्रद्धाने आपला आवाज दिला आहे. ‘एक व्हिलन’ या प्रेम-थरारपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले आहे. चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ कपूरबरोबर रितेश देशमुख एका छोट्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘बालाजी मोशन पिक्चर्स’द्वारा निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट यावर्षी २७ जून रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरचा या अगोदरच बोलबोला झाला असून, प्रदर्शनापासून केवळ दोनच दिवसांत १० लाखांच्यावर लोकांनी हे ट्रेलर पाहिले आहे.