scorecardresearch

श्रृती हासनचं नागा चैतन्यवर होतं जीवापाड प्रेम, पण त्याने बहिणीबरोबर केलं असं काही की झालं ब्रेकअप

समांथाशी लग्न करण्याआधी नागा चैतन्य श्रृती हासनला करत होता डेट

shruti haasan, shruti haasan birthday, shruti haasan love life, shruti haasan age, naga chaitanya, shruti haasan boyfriend, श्रुती हासन, नागा चैतन्य, श्रुती हासन वाढदिवस, श्रुती हासन वय, श्रुती हासन बॉयफ्रेंड
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसनचा आज वाढदिवस. श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पण आपल्या अभिनय कारकिर्दीपेक्षा श्रुती हासन तिच्या खासगी आयुष्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. श्रुतीचं नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ते सामंथा रुथ प्रभूचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. श्रुतीनं रणबीरबरोबर अफेअरच्या चर्चा या अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण नागा चैतन्य आणि श्रुती हासनच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

श्रुती हासन सध्या शांतनूला डेट करत आहे. श्रुती आणि नागा चैतन्यच्या अफेअरचा हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा नागा चैतन्य आणि सामंथा यांचं लग्न झालं नव्हतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१३ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन एकमेकांना डेट करत होते. श्रुती नागा चैतन्यच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. एवढंच नाही तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या.

आणखी वाचा- ब्रेकअप झाल्यानंतर कमल हासनच्या लेकीला लागलं होतं ‘हे’ व्यसन

एका अवॉर्ड सोहळ्यात या दोघांमधील जवळीक पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लवकरच हे दोघं लग्न करतील असंही त्यावेळी बोललं जात होतं. पण काही काळातच हे दोघंही वेगळे झाल्याचं वृत्त समोर आलं. विशेष म्हणजे या दोघांच्या ब्रेकअपचं जे कारण समोर आलं त्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले होते.

आणखी वाचा- “मी कोणाचंही काम हिसकावून घेतलं नाही, पण तरीही…” श्रुती हासनचं बॉलिवूडबद्दल मोठं वक्तव्य

श्रुती हासन आणि नागा चैतन्य यांचं नातं तुटण्याचं कारण श्रुतीची बहीण अक्षरा असल्याचं बोललं गेलं होतं. याचा एक किस्सा नंतर बराच चर्चेत आला होता. असं बोललं जात होतं की, श्रुती, अक्षरा आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमासाठी गेले होते. ज्यात श्रुती परफॉर्म करत होती. दरम्यान नागा चैतन्य आणि अक्षरा यांना तिथून निघायचं होतं पण श्रुती त्यांच्यासोबत जाऊ शकत नसल्यानं नागा चैतन्यला तिने अक्षराला घरी सोडण्यास सांगितलं होतं. पण अचानक काही कारणानं नागा चैतन्य अक्षराला घरी सोडू शकला नाही. यावरून नागा चैतन्य आणि श्रुती यांच्यात वाद झाले. त्यानंतरच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं.

दरम्यान या घटनेनंतरही २०१६ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन यांनी ‘प्रेमम’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २०१७ साली नागा चैतन्य आणि सामंथा यांचं लग्न झालं आणि काही महिन्यांपूर्वीच या दोघांनी घटस्फोटही घेतला. मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अजूनही सोशल मीडियावर होताना दिसतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 13:06 IST
ताज्या बातम्या