scorecardresearch

Premium

नागा चैतन्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती श्रुती हासन, पण बहिणीसाठी…

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या चित्रपटांपेक्षा खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली.

shruti haasan, shruti haasan birthday, shruti haasan love life, shruti haasan age, naga chaitanya, shruti haasan boyfriend, श्रुती हासन, नागा चैतन्य, श्रुती हासन वाढदिवस, श्रुती हासन वय, श्रुती हासन बॉयफ्रेंड
नागा चैतन्य आणि श्रुती हासनच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हसनचा आज ३५ वा वाढदिवस. श्रुतीनं दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पण आपल्या अभिनय कारकिर्दीपेक्षा श्रुती हासन तिच्या खासगी आयुष्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. श्रुतीचं नाव बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ते सामंथा रुथ प्रभूचा पूर्वश्रमीचा पती नागा चैतन्यपर्यंत बऱ्याच अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. श्रुतीनं रणबीरसोबत अफेअरच्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण नागा चैतन्य आणि श्रुती हासनच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

अलिकडच्या काळात नागा चैतन्य आणि सामंथा त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत. तर श्रुती सध्या शांतनूला डेट करत आहे. श्रुती आणि नागा चैतन्यच्या अफेअरचा हा किस्सा त्यावेळचा आहे जेव्हा नागा चैतन्य आणि सामंथा यांचं लग्न झालं नव्हतं. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार २०१३ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन एकमेकांना डेट करत होते. श्रुती नागा चैतन्यच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. एवढंच नाही तर या दोघांच्या लग्नाच्या चर्चाही सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या.

askshay kumar shahrukh khan salman khan
यशाची नवी समीकरणे!
sardari begum
सूर संवाद : श्रीमंत करणारा अनुभव!
the vaccine war
विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ला सर्वत्र थंड प्रतिसाद, प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचण्यासाठी निर्मात्यांनी दिली ‘ही’ लहास ऑफर
naseeruddin-shah-blog
नसीरुद्दीन शाह – अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ की चित्रपटांवर टिप्पणी करणारे ‘हौशी’ समीक्षक?

एका अवॉर्ड सोहळ्यात या दोघांमधील जवळीक पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लवकरच हे दोघं लग्न करतील असंही त्यावेळी बोललं जात होतं. पण काही काळातच हे दोघंही वेगळे झाल्याचं वृत्त समोर आलं. विशेष म्हणजे या दोघांच्या ब्रेकअपचं जे कारण समोर आलं त्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले होते.

श्रुती हासन आणि नागा चैतन्य यांचं नातं तुटण्याचं कारण श्रुतीची बहीण अक्षरा असल्याचं बोललं गेलं होतं. याचा एक किस्सा नंतर बराच चर्चेत आला होता. असं बोललं जात होतं की, श्रुती, अक्षरा आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमासाठी गेले होते. ज्यात श्रुती परफॉर्म करत होती. दरम्यान नागा चैतन्य आणि अक्षरा यांना तिथून निघायचं होतं पण श्रुती त्यांच्यासोबत जाऊ शकत नसल्यानं नागा चैतन्यला तिने अक्षराला घरी सोडण्यास सांगितलं होतं. पण अचानक काही कारणानं नागा चैतन्य अक्षराला घरी सोडू शकला नाही. यावरून नागा चैतन्य आणि श्रुती यांच्यात वाद झाले. त्यानंतरच या दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं.

दरम्यान या घटनेनंतरही २०१६ साली नागा चैतन्य आणि श्रुती हासन यांनी ‘प्रेमम’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २०१७ साली नागा चैतन्य आणि सामंथा यांचं लग्न झालं आणि अलिकडेच या दोघांनी घटस्फोटही घेतला. ज्यावरून अद्याप सोशल मीडियावर उलट- सुलट चर्चा होताना दिसत आहेत. श्रुतीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात प्रभाससोबत ‘सालार’ चित्रपटात दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shruti haasan birthday special know about her love life with naga chaitanya mrj

First published on: 28-01-2022 at 09:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×