लेकीचे पत्र पाहून शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

शुभांगी गोखले भावूक झाल्या आहेत.

sakhi gokhale,

मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अनेक कलाकार आणि तंत्रज्ज्ञ एकत्र येतात. ऑन स्क्रीन एकत्र कुटुंबातील सदस्यांची भूमिका साकारताना ऑफ स्क्रीनही त्यांच्यात अनोखे बंध जुळतात. असंच काहीसं बाँडिंग झी मराठी वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील कलाकारांमध्ये पाहायला मिळत आहे. ओमच्या आईसाठी ‘येऊ कशी तशी…’च्या सेटवर एक पत्र आलं. हे पत्र इतकं गोड होतं, की फक्त अभिनेत्री शुभांगी गोखलेच नाही, तर त्यावेळी सेटवर उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

महाराष्ट्रात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लावल्यामुळे सर्व चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगला राज्याबाहेर जावे लागत आहे. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेचे शूटिंग सध्या सिल्वासा येथे करण्यात येत आहे. मालिकेची सर्व टीम बायो बबलचं पालन करत असल्यामुळे कोणालाच आपल्या मुलांसोबत किंवा आईसोबत प्रत्यक्ष हजेरी लावता आली नाही. अशातच सेटवर केक आणि एक भावनिक पत्र आले आणि सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले आहे.

आणखी वाचा : ‘शर्म है या बेच दी’, बोल्ड ड्रेस परिधान करुन डान्स केल्यामुळे रश्मी देसाई झाली ट्रोल

अभिनेत्री शुभांगी गोखले यांची कन्या आणि अभिनेत्री सखी गोखले हिने मदर्स डे निमित्त केकसोबत एक पत्रही पाठवले. “अम्मा शुभांगी गोखले, अदिती सारंगधर, दीप्ती केतकर, शुभांगी भुजबळ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील सर्व ऑन आणि ऑफ स्क्रीन मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. इतक्या छान आई होण्यासाठी आभार. आमचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून दूर राहून काम करण्यासाठी धन्यवाद” असे सखीने पत्रात लिहिले आहे.

हे पत्र वाचून शुभांगी गोखले तर भावनावश झाल्याच, पण मुलांच्या आठवणींनी आणि मुलांना आईच्या आठवणीनी एवढं रडू कोसळलं, या वैश्विक संकटकाळात तू पाठवलेलं प्रेम.. सगळं भरुन पावलं, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shubhangi gokhale get emotion on set of yeu kashi tashi mi nandayla avb