इब्राहिम अली खान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉयफ्रेंड!

पलक तिवारी तिच्या रिलेशनशिपमुळे सातत्याने चर्चेत आहे.

इब्राहिम अली खान नाही तर ‘हा’ अभिनेता आहे श्वेता तिवारीच्या लेकीचा बॉयफ्रेंड!
हा अभिनेता लवकरच सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्यासोबत 'द आर्चीज'मध्ये दिसणार आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘बिजली बिजली’ या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पलकचं हे गाणं सोशल मीडियावर खूप हीट झालं होतं. पण याशिवाय ती काही वेळा इब्राहिम अली खानसोबत स्पॉट झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या होत्या. पण आता मात्र पलकचं नाव इब्राहिम नाही तर दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. हा अभिनेता लवकरच सुहाना खान आणि खुशी कपूर यांच्यासोबत ‘द आर्चीज’मध्ये दिसणार आहे.

पलक तिवारी सध्या अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. वेदांग लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करत आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री खुशी कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. एका रिपोर्टनुसार पलक आणि वेदांग एकमेकांना एका पार्टीमध्ये भेटले होते. दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

‘पिंकव्हिला’नं दिलेल्या पलक आणि वेदांग दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. एवढंच नाही तर पलकची आई अभिनेत्री श्वेता तिवारी देखील वेदांगला ओळखते. आपल्या मुलीच्या निवडीवर श्वेता तिवारी खुश आहे. मात्र सध्या दोघंही त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे त्यांनी हे नातं सध्या तरी कुठेही जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पलककडे सध्या दोन चित्रपट आहेत. ती सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ आणि अरबाज खानच्या ‘रोजी: द केसर चॅप्टर’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shweta tiwari daughter palak tiwari is not dating ibrahim ali khan but vedang raina mrj

Next Story
“आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी