scorecardresearch

Video:’माझ्या ब्राचं माप देव घेतोय’, श्वेता तिवारी का म्हणाली असं? संपूर्ण व्हिडीओ आला समोर

जाणून घ्या श्वेता तिवारीने असं का म्हटले? काय आहे प्रकरण?

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. ती कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत असते तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या श्वेताने एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. श्वेताने अंतर्वस्त्रासंबंधी बोलताना देवाचा उल्लेख केल्याने मोठा वाद रंगला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण ज्या व्हिडीओमुळे श्वेतावर टीका होत त्या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ आता समोर आला आहे.

श्वेता तिवारीने बुधवारी (२६ जानेवारी) भोपाळमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या आगामी वेब सीरिज ‘शो स्टॉपर: मीट द ब्रा फिटर’ची घोषणा केली. याच कार्यक्रमातील श्वेताचा “माझ्या ब्रा चे माप देव घेत आहे” असे बोलतानाचा एक छोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता या कार्यक्रमातील संपूर्ण व्हिडीओ समोर आला असून श्वेता असं का म्हणाली हे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा : ‘फोटो काढून टाका नाहीतर…’, प्रजासत्ताक दिनानिमित्त पोस्ट केलेल्या फोटोमुळे बिग बी झाले ट्रोल

आणखी वाचा : पाकिस्तानी पीएमला पाठवण्यात आला होता रवीना टंडनच्या नावाचा बॉम्ब, अभिनेत्रीने दिली आता प्रतिक्रिया
ईटाइम्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या ३ मिनिट २४ सेकंदाच्या व्हिडीओच्या सुरुवातीला श्वेताचे कोस्टार दिगांगना सूर्यवंशी आणि सौरभ राज बोलताना दिसत आहेत. सौरभने आजवर काही मालिकांमध्ये देवाची भूमिका साकारली आहे आणि आता या शोमध्ये तो ब्रा फिटरची भूमिका साकारणार आहे. यावर दिगांगना म्हणते, ‘माझे अनेक मित्र आहेत ज्यांना असे वाटते की जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी रडलात तर ती खूप मोठी चूक आहे. तुम्ही मुलं आहात म्हणून असे नाही बोलू शकत. अशा गोष्टी मुलींसोबत घडत असतात. मला असे वाटते टॅबू प्रत्येक ठिकाणी आहे. जसं की एक मुलगा जर ब्रा फिटर बनत आहे तर तुम्ही त्याच्याकडे वेळ्या दृष्टीकोनातून पाहाता. तो थोडीना मुलगी आहे असे बोलले जाते’ असे दिगांगनाने म्हटले.

दरम्यान, प्रश्न विचारणाऱ्याने सौरभ राज जैनकडे इशारा करत म्हटले, ‘याच्याकडे देखील तुम्ही याच नजरेने पाहाता. हाच आहे जो भूमिका साकारतो. याने तर कितीवेळा देवाची भूमिका साकारली आहे.’ व्हिडीओच्या शेवटी मजेशीर अंदाजात श्वेता बोलताना दिसते, ‘देवानंतर थेट ब्रा फिटर. म्हणजे उडी पाहा.’ त्यानंतर सर्वजण सौरभसोबत मस्ती करताना दिसतात. तेव्हा श्वेता म्हणते ‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे.’ यावर दिगांगना आणि श्वेताला हसू अनावर होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shweta tiwari full video meri bra ka size bhagwan le rahe know what excatly happened avb

ताज्या बातम्या