ब्रा साईज आणि देवावरून वक्तव्य करणाऱ्या श्वेता तिवारीवर कारवाई होणार?

श्वेता तिवारीने भोपाळमध्ये एका पत्रकार परिषदेत असे वक्तव्य केले होते.

shweta tiwari,
श्वेता तिवारीने भोपाळमध्ये एका पत्रकार परिषदेत असे वक्तव्य केले होते.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. श्वेता तिच्या अभिनयासोबतच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. दरम्यान, नुकताच श्वेताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान तिने ब्रा साईज आणि देव याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

श्वेता भोपाळमध्ये तिची आगामी सीरिजच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्वेताने तिच्या ब्राच्या मापावर आणि देवा विषयी एक वक्तव्य केलं. यावेळी श्वेता म्हणाली की, माझ्या ब्राचे माप देव घेत आहे. श्वेताचे हे विधान ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे लोक थक्क झाले होते. श्वेताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

श्वेताच्या या आगामी सीरिजचे दिग्दर्शन मनीष हरिशंकर करत आहेत. मनीष यांच्यासोबत या सीरिजची संपूर्ण टीम भोपाळमध्ये प्रमोशनसाठी आली होती. श्वेताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना नरोत्तम मिश्रा म्हणाले, श्वेताचे वक्तव्य मी ऐकले, पाहिलं. तिने केलेल्या वक्तव्याची मी निंदा करतो. मी भोपाळ पोलिस कमिश्नर यांना निर्देश दिले आहे की या घटनेची तपासनी करून रिपोर्ट लवकरात लवकर सादर करावी. त्यानंतर कारवाई करण्यात येईल.

आणखी वाचा : रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा श्वेता तिवारी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ती तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत येत असते. दोन लग्न आणि घटस्फोटामुळे श्वेताचं खासगी आयुष्य चर्चेत राहिलं आहे. १९९८ सालामध्ये श्वेता तिवारीने अभिनेता राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. त्यांना पलक ही मुलगी आहे. तर २००७मध्ये श्वेता आणि राजा विभक्त झाले. राजा चौधरीवर श्वेता तिवारीने हिंसाचाराचा आरोप केला होता.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

त्यानंतर श्वेताने २०१३ सालामध्ये अभिनेता अभिनव कोहलीसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे. तर अभिनवदेखील हिंसाचार करत असून छळ करत असल्याचा आरोप श्वेताने केला होता. त्यानंतर २०१९ सालामध्ये श्वेताने अभिनवला घटस्फोट दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shweta tiwari gives controversial statement on god in bhopal during web series announcement dcp

Next Story
‘यंदाच्या निवडणुकीतही ते विजयी होतील’, ‘या’ अभिनेत्याच्या आईने पंतप्रधान मोदींना दिला आशीर्वाद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी