दिग्दर्शक शकुन बत्रा यांचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात दीपिका आणि सिद्धांतने अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स देखील दिले आहेत. हे इंटिमेट सीन्स चर्चेत आहेत. आता सिद्धांतने हे इंटिमेट सीन्स पाहून कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.

‘गहराइयां’ चित्रपटातील इंटिमेट सीन्स पाहिल्यावर कुटुंबीयांची प्रतिक्रिया कशी होती हे सिद्धांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. ‘मी कुटुंबीयांसाठी टीव्हीवर चित्रपटाचा ट्रेलर लावला आणि तेथून निघून गेलो. असेच चित्रपटातील गाणे डूबे प्रदर्शित झाले तेव्हा झाले. मी कुटुंबीयांना चित्रपटातील गाणे १० वाजता प्रदर्शित होणार हे सांगितले. मी टीव्ही सुरु केला. ते गाणे लावले आणि बेडरुमध्ये पळत गेलो. काही वेळानंतर मी पुन्हा बाहेर आलो तेव्हा माझे वडील समोर बसले होते. ते म्हणाले मस्त’ असे सिद्धांत म्हणाला.
आणखी वाचा : ‘गहराइयां’मध्ये इंटिमेट सीन शूट करण्याविषयी दीपिका म्हणते…

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
artificial intelligence use in film
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

पुढे तो म्हणाला, ‘माझ्या कुटुंबीयांचा मला नेहमी पाठिंबा असतो. पण जेव्हा हा गाणे प्रदर्शित झाले तेव्हा मला लाज वाटली होती. माझ्या कुटुंबीयांनी चित्रपट पाहिला आणि त्यांना तो आवडला देखील. पण मी त्यांच्यासोबत चित्रपटासंबधी चर्चा केली नाही. कारण तुम्ही तुमच्या पालकांसोबत काही गोष्टींवर बोलू शकत नाही. माझे वडील माझ्या रुममध्ये आले आणि त्यांना माझ्या चित्रपटाविषयी, अभिनयाविषयी बोलायचे होते. पण मी त्यांना म्हटले, हा ठिक आहे.. काही हरकत नाही..’

यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकारांनी कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी सिद्धांतने त्याच्या काकांचा एक किस्सा शेअर केला होता. ज्यावर सर्वांनाच हसू आवरेनासे झाले होते. तो म्हणाला, “जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यावेळी माझ्या गावच्या काकांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या बाबांना भोजपुरीमध्ये विचारलं, ‘भई इक बात हमरा के। ई जौन किसिंग भईल बा, स्पर्श भईल बा कि ना? या ऐसे बीच में शीशा रखा ला?’

सिद्धांत पुढे म्हणाला, “म्हणजे ते म्हणत होते, ‘यांनी हे खरंच असं किस केलं की दोघांच्यामध्ये आरसा होता? त्यावर माझे बाबा म्हणाले, आता यावर मी काय बोलू?” ते ऐकून सर्वांना हसू अनावर झाले होते.